VIDEO: कोविड 19 च्या नावाने उपवास; चक्क 'कोरोना दावत'; तामिळनाडू पोलिसांकडून आयोजकास अटक
पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तंजावूर जिल्ह्यातील Kabisthalam परिसरात अनेक लोक एकत्र आले होते.
तामिळनाडू पोलिसांनी एका 29 वर्षीय व्यक्तिला अटक केली आहे. या व्यक्तिने कोविड 19 (COVID-19) विषाणूच्या नावाने उपवास करत चक्क 'कोरोना दावत' (Coronavirus Feast) आयोजित केली होती. तसेच, या दावतसाठी अनेक मित्र आणि नागरिकांनाही आमंत्रीत केले होते. विशेष म्हणजे अनेक लोकांनी मोठ्या उत्साहाने आमंत्रण स्वीकारत या विचित्र प्रकारात सहभाग नोंदवला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच तामिळनाडू पोलिसांनी आरोपीस अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तंजावूर जिल्ह्यातील Kabisthalam परिसरात अनेक लोक एकत्र आले होते. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात हे लोक जमले होते. त्यांनी एकत्र येत भोजनाचा आस्वाद घेतला. ही घटना बुधवारी (15 एप्रिल 2020) या दिवशी घडली. फेसबुस, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर आदींद्वारे या घटनेचा व्हिडिओ व्हायरस झाला. त्यानंतर आम्ही संबंधितांवर कारवाई केली. (हेही वाचा, स्पेन: Lockdown च्या नियमांचे उल्लंघन करत एका महिलेने नग्न अवस्थेत पोलिसांच्या गाडीवर घातला धिंगाणा)
व्हिडिओ
ज्या व्यक्तीने कोरोना दावत आयोजित केली होती तो व्यक्ती काही महिन्यांपूर्वीच तंजावूर जिल्ह्यात आला आहे. शिवगुरु असे या व्यक्तीचे नाव आहे. तो आ आधी तिरुप्पूर येथे काम करत होता. सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हडिओत केळीच्या पानांवर जेवन वाढलेले आणि त्याच्या दोन्ही बाजूला मोठा समुदाय येकत्र येऊन भोजन घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, तामिळनाडू पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम, 188, 269 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.