Coronavirus: कोरोना व्हायरसच्या विरोधात लढायचे असल्यास मास्क घालण्यासंदर्भात संदेश देणारे Mask Rap महापालिकेकडून प्रदर्शित, पहा व्हिडिओ

अशातच नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: AFP)

राज्यासह आता मुंबईत (Mumbai) सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. अशातच नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मास्क घालण्यासंदर्भात एक आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बद्दलचाच एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.(CM Uddhav Thackeray On Lockdown: काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, एक-दोन दिवसांत निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

मुंबई महापालिकेने शेअर केलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती मास्क शिवाय घरातून निघाला आहे. तेव्हा वाटेतच महापालिकेचे कर्मचारी अडवतात आणि त्याला मास्क घालण्यासंदर्भात सांगताना दिसून येत आहेत. यामध्ये ते सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मास्क का घालावा आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी मास्क घालणे किती महत्वाचे असल्याचे ही ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीला पटवून देत आहेत.(CM Uddhav Thackeray यांनी मुंबई त J J Hospital मध्ये घेतला Covaxin Vaccine चा पहिला डोस)

Tweet:

तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना जर पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर मास्क घालण्यासह नियमांचे पालन करावे असे स्पष्ट केले होते.  त्याचसोबत मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा सध्या सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमुळे काही प्रमाणात वाढत असल्याचे बोलले जात आहे.