Coral Life In Mumbai: मुंबईत Coastal Road Project मार्गात आढळलेल्या 18 Coral Colonies चं Wildlife Clearance नंतर सुरक्षित स्थलांतरण होण्याची शक्यता; इथे पहा वरळी, हाजी अली जवळील प्रवाळांचे मोहक फोटोज!

सध्या त्याच्याशी संबंधित इतर कायदेशीर बाबी, स्थलांतरणाची जागा याची चाचपणी सुरू आहे.

Coral colonies of Mumbai (Photo Credits: Joyel Shaikh)

मुंबई शहर म्हटलं की नेहमी टोलेजंग इमारती आणि गर्दी असंचं चित्र आपल्या नजरेसमोर येतं. पण समुद्र किनारी 7 बेटांनी तयार झालेल्या या शहराच्या समुद्र किनारी मोहक रंगांचे आणि चित्र-विचित्र आकारांच्या Coral Colonies म्हणजेच प्रवाळं असतील याची आपल्यापैकी अनेकांना साधी कल्पना देखील नसेल. सध्या मुंबईच्या वरळी आणि हाजी अली परिसरामधून सुमारे 18 Coral Colonies च्या स्थलांतरणासाठी मुंबई महानगर पालिकेने वन्यजीव मंजुरी (wildlife clearance) साठी प्रस्ताव पाठवला आहे. कोस्टल रोड प्रोजेक्ट दरम्यान या Inter-Tidal Coral Colonies आढळल्या आहेत. दरम्यान त्या आता मुंबईमध्येच मरीन ड्राईव्ह, नेव्ही नगरचा गीता नगर आणि कुलाबा मध्ये स्थलांतरीत केल्या जाऊ शकतात. Joyel Shaikh यांंनी टिपलेले फोटो ट्वीटर वर शेअर करण्यात आले आहेत. या माध्यमातून मुंबईच्या सागरी किनार्‍यावर असणार्‍या आणि वर्षानुवर्ष मुंबईमध्ये राहून अनभिज्ञ असणार्‍या अनेकांसाठी प्रवाळांचे मोहक फोटोज शेअर केले आहेत.

दरम्यान इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिकेने सप्टेंबर महिन्यात 18 Coral Colonies च्या स्थलांतरणासाठी महाराष्ट्र वनविभागाच्या Mangrove Cell कडे प्रस्ताव पाठवला आहे. सध्या त्याच्याशी संबंधित इतर कायदेशीर बाबी, स्थलांतरणाची जागा याची चाचपणी सुरू आहे. यावर अंतिम निर्णय Principal Chief Conservator of Forest (Wildlife) घेणार आहेत. पण मुंबईच्या सागरी जीवासृष्टीमधील हा अमुल्य आणि तितकाच विलोभनीय ठेवा अनेकांसाठी आश्चर्यकारक असेल!

पहा मुंबईच्या सागरी किनारपट्टीवरील प्रवाळांचं मोहक रूप

द नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ऑशनोग्राफी (NIO)यांच्याकडे या प्रोजेक्ट भागातील प्रवाळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या माहितीनुसार हाजी अली आणि वरळी भागात प्रवाळांच्या 6 जाती आहेत. Rhizangiidae family (Oulangia and one unidentified species)च्या 2 जाती आहेत. वरळीमध्ये 18 कोरल कॉलनीज सुमारे 0.251 स्क्वेअर मीटरमध्ये आहेत. तर Dendrophylliidae family ही हाजी अली मध्ये अंदाजे 1.1 फीट भागात आहेत. ही हार्ड कोरल्स असून लो टाईडच्या वेळेस मुंबईकर सहज पाहू शकतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif