Condom Cafe: थायलंडमध्ये सुरु झाला कंडोम थीमवर आधारीत अनोखा कॅफे; Safe Sex बद्दल जागरूकता पसरवणे हा उद्देश (Watch)

यासोबतच येथे येणाऱ्या ग्राहकांना मोफत गर्भनिरोधकही दिले जातात. या कॅफेमध्ये एक हस्तकला स्टोअर देखील आहे, ज्याची थीमदेखील कंडोम आहे.

कंडोम थीम असलेला कॅफे (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

थायलंड (Thailand) हा एकमेव आग्नेय आशियाई देश आहे जिथे कधीही युरोपियन शक्तीची वसाहत नव्हती. थायलंडमधील सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, रेस्टॉरंट्स आणि जंगले पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. परंतु या सर्वांशिवाय सध्या एका कॅफेने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा कॅफे कंडोम (Condom) थीमवर बनवण्यात आला असून त्याचे नाव आहे, 'द कॅबेज अँड कंडोम्स कॅफे' (The Cabbages and Condoms Cafe).

थाई फूड सर्व्हिस कंपनीने कुटुंब नियोजनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या कॅफेमध्ये सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर कंडोमचा वापर केला आहे. सध्या हा कंडोम थीमवर आधारित कॅफे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती मोहनीश दौलतानी याने नुकताच या कॅफेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soham Sinha | Kolkata Blogger (@kolkatadelites)

या कॅफेची प्रत्येक सजावट कंडोमच्या मदतीने करण्यात आली आहे. हा कॅफे 6 10 सुखुमवित 12 गल्ली, ख्वांग ख्लोंग तोई, ख्लोंग तोई, बँकॉक, थायलंड येथे असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॅफेमधील जवळजवळ सर्व काही कंडोमने सजवलेले किंवा बनलेले आहे. पुतळ्याच्या रंगीबेरंगी पोशाखांपासून ते सजावटीची फुले, दिवे आणि झुंबर सर्वकाही कंडोमपासून बनलेले आहे. अगदी कॅफे टेबलही कंडोमने सजलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohnish Doultani (@mohnishdoultani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cabbages & Condoms Bangkok (@cabbagesandcondoms)

या कंडोम थीम असलेल्या कॅफेचा उद्देश सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देणे हा आहे. यासोबतच येथे येणाऱ्या ग्राहकांना मोफत गर्भनिरोधकही दिले जातात. या कॅफेमध्ये एक हस्तकला स्टोअर देखील आहे, ज्याची थीमदेखील कंडोम आहे. या स्टोअरमध्ये डिझायनर हस्तकला उपलब्ध आहेत. (हेही वाचा: XXX वेबसाइट Pornhub.com पोर्न साइटला भेट देणाऱ्या यूजरसाठी वयाची अट)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cabbages & Condoms Bangkok (@cabbagesandcondoms)

हा कॅफे त्याच्या वेगळेपणासोबतच लोकांच्या चवीचीही काळजी घेतो. येथे ताजी कॉफी, मॉकटेल आणि आइस्क्रीमसह स्वादिष्ट आणि अस्सल थाई खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे जर तुम्ही थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर या कॅफेला नक्की भेट देऊ शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif