Smokey Biscuit 'Death' Viral Video: स्मोक बिस्कीट खाल्ल्यानंतर लहान मुलाचा मृत्यू, की आहे जिवंत? काय आहे नेमकं सत्य?

काचेतून मोठ्या प्रमाणात पांढरा धूर निघताना दिसत आहे.

(Photo Credit: X/ @ShivamdixitInd)

Smokey Biscuit 'Death' Viral Video: बर्फ किंवा द्रव नायट्रोजनमधून धूर निघाताना आपण पाहिला असेल. सध्या त्यामुळे एक मुलाचा मृत्यू झाला असं दर्शवतानाचा व्हिडीओ समोर आला होता. पण तो फेक असल्याचं आता सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ एका जत्रेतला आहे. ज्यात मुलगा स्मोकी बिस्कीट खाताना दिसत आहे. ज्यामुळे त्याच्या तोंडात धूर ही निघताना दिसत आहे. थोड्या वेळाने पोट पकडत असल्यामुळे मूलगा किंचाळतो. काही जण त्याला पाणी देत आहेत. मात्र, तो मुलगा अस्वस्थ दिसतो. त्या व्हिडीओवर काहींनी तीव्र प्रतिक्रीया देत नाराजी व्यक्त केली. अशा खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाला केले. (हेही वाचा : Smoke Biscuit Video: स्मोक बिस्किट खाल्ल्याने तमिळनाडूमध्ये मुलाचा मृत्यू, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल)

आज तकच्या वृत्तानुसार, कर्नाटकातील दावणगेरे येथे ‘स्मोक बिस्किट’ खाल्ल्यानंतर मूलगा आजारी पडल्याची घटना घडली. मुलाला त्याच्या पालकांनी लगेच रुग्णालयात नेले आणि उपचारानंतर तो पूर्णपणे बरा आहे.

व्हिडीओमध्ये काउंटरवर ‘स्मोक बिस्किट’ असेही लिहिलेले आहे. हे द्रव नायट्रोजनसह नियमित बिस्किटांचे मिश्रण करून तयार केले जाते. जेव्हा तुम्ही हे बिस्किट खाता तेव्हा तुमचे तोंड धुराने भरते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif