Chetan Singh Solanki यांचा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये 'फाटक्या सॉक्स' मधील फोटो वायरल; पहा 'Solar Man of India' ओळख असलेली ही व्यक्ती कोण?

20 वर्षांपासून तेथे चेतन शिकवत आहेत. ते प्रख्यात solar scientist आहेत त्यामुळे त्यांची ओळख Solar Man of India झाली आहे.

IIT professor Chetan Singh Solanki

सोशल मीडीयामध्ये सध्या IIT Professor Chetan Singh Solanki यांचा एक फोटो वायरल झाला आहे. ज्यामध्ये ते फाईव्ह स्टार हॉटेलात फाटलेल्या सॉक्स मध्ये दिसले. एका कार्यक्रमाच्या पूर्वी भाषणाची तयारी करतानाचा त्यांचा हा फोटो शेअर झाल्यानंतर Solar Man of India किंवा Solar Gandhi या नावाने ओळखल्या जाणार्‍या चेतन सिंह सोलंकी यांनीच त्यामागील कहाणी सांगितली आहे.

चेतन सिंह सोलंकी यांचं म्हणणं काय?

लिंक्ड इन (Linked in) वर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी 'आपण हयात दिल्ली मध्ये असताना एका कार्यक्रमासाठी स्टेज वर जाण्यापूर्वीचा हा फोटो असल्याचं म्हटलं आहे. माझे सॉक्स फाटलेल्या अवस्थेत आहेत. मी ते सहज बदलू शकत होतो. नवीन विकत घेऊ शकतो पण सध्या हे निसर्ग सहन करू शकत नाही.' त्यांनी पोस्ट केल्यानंतर कमेंट्स मध्ये अनेकांनी त्यांच्या कृतीचं कौतुक केले आहे.

Chetan Singh Solanki कोण आहेत?

चेतन हे IIT Bombay चे प्रोफेसर आहेत. 20 वर्षांपासून तेथे चेतन शिकवत आहेत. ते प्रख्यात solar scientist आहेत त्यामुळे त्यांची ओळख Solar Man of India झाली आहे. या क्षेत्रामध्ये त्यांची खास ओळख आहे. चेतन हे शिक्षक, संशोधक, लेखक आहेतच पण यासोबतच ते philosophy of life वर देखील बोलतात. ते Energy Swaraj Foundation चे संस्थापक आहेत आणि गेल्या काही दशकांपासून ते सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी 20 राज्यांमध्ये 43,000 किमी पेक्षा जास्त प्रवास करून पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेवर आहेत.

प्रोफेसर Chetan Singh Solanki साठी, 'Sustainability' हा केवळ शिकवण्यासाठीचा विषय नाही - ही जीवनशैलीची निवड आहे. सध्या ते याला मूर्त रूप देत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत त्यांना मध्य प्रदेश सरकारने नुकतीच Solar Energy चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.