Cheems Dog Death: इंटरनेटवरील सर्वाधिक व्हायरल चीम्स कुत्र्याचा मृत्यू

टरनेटवर सर्वाधिक व्हायरल झालेल्या आणि मिम्स बनविण्यासाठी नेटीझन्सची पहिली पसंती असलेल्या चीम्स नामक श्वानाचा मृत्यू झाला आहे.

Cheems Dog Death | (Photo Credit - Twitter)

इंटरनेटवर सर्वाधिक व्हायरल झालेल्या आणि मिम्स बनविण्यासाठी नेटीझन्सची पहिली पसंती असलेल्या चीम्स नामक श्वानाचा मृत्यू (Cheems Dog Death) झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला. अनेकांना अश्रू अनावर झाले. शिबा इनू प्रजातीचा हा कुत्रा इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय होता. अनेकांसाठी तो मीम्स आयकॉन होता. तो 12 वर्षांचा होता. त्याच्यावर थोरॅसेन्टेसिस शस्त्रक्रिया सुरु होती. ही शस्त्रक्रिया सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. जगभरात सेलिब्रेटी असलेल्या कुत्र्यावर शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी आणि इतर संभाव्य उपचार केले जाणार होते. तत्पूर्वीच त्याचा प्रकृतीअस्वास्थ्याने मृत्यू झाला.

चीम्स कुत्र्याबाबत माहिती देणाऱ्या अधिकृत इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याच्या मालकाने म्हटले आहे की, त्याच्यावर शुक्रवारी सकाळी शेवटची थोरॅसेन्टेसिस शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो झोपी गेला तो पुन्हा उठलाच नाही. खरे तर त्याच्या या शस्त्रक्रियेनंतर त्याच्यावर आम्हाला केमोथेरपी किंवा इतर संभाव्य उपचारांची व्यवस्था करायची होती, पण खूप उशीर झाला. आता तो आपल्यात नाही.

कुत्र्याच्या मालकाने पुढे म्हटले की, चिम्स तर आपल्यातून गेला. पण त्याने आपल्यासमोर आणलेला संग्रही ठेवलेला आनंद आपल्यात आहे. मात्र, तुम्हाला मला जोडून ठेवणारा एक हसरा चेहरा गेला. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्याने लोकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी मोठी मदत केली. माझ्यासह अनेकांना आनंद दिला. मात्र, त्याचे ध्येय पूर्ण झाल्यामुळे त्याने आपला निरोप घेतला असे वाटते.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Cheems_Balltze (@balltze)

बॉलत्झे 12 वर्षांचा होता आणि तो त्याच्या मालक कॅथीसोबत हाँगकाँगमध्ये राहत होता. त्याला त्याच्या मालकाने दत्तक घेतले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कॅथी शिबा इनूच्या "डेली मूड" आणि "क्यूटनेस" चे फोटो अपलोड करत असे. जेव्हा कुत्र्याचा एक अस्ताव्यस्त फोटो आयकॉनिक मेम बनला तेव्हा चीम्सची लोकप्रियता वाढली.