Cabin Crew Dangerous Stunt Video: कडून विमानाच्या पंख्यांवर डान्स; धक्कादायक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर Viral
ते बोईंग 777 विमानाच्या ( Boeing 777 aircraft) पंख्यांवर चढून अत्यंत धोकादायक पद्धतीने डान्स करताना व्हिडिओत दिसतात. व्हायरल झालेले व्हि
Swiss International Air Lines: सोशल मीडियावर काही फोटो आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये क्रू मेंबर्स (Crew Members Danc Video) विमानाच्या पंख्यांवर चढून डान्स करताना दिसतात. प्राप्त माहितीनुसार ते स्विस इंटरनॅशनल एअर लाइन्सचे करमचारी आहेत. ते बोईंग 777 विमानाच्या ( Boeing 777 aircraft) पंख्यांवर चढून अत्यंत धोकादायक पद्धतीने डान्स करताना व्हिडिओत दिसतात. व्हायरल झालेले व्हिडिओ फुटेज विमानतळ टर्मिनलमध्ये थांबलेल्या एका प्रवाशाने टिपल्याची माहिती आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला फ्लाइट अटेंडंट विमानाच्या पंखांवर नाचताना दिसते आणि नंतर तिच्यासोबत एक पुरुष सहकारी देखील तेच करताना दिसतो. सांगितले जात आहे की, हा पुरुष एक केबिन प्रमुख आहे. विमानाच्या पंख्यांवर चढून तो बॉडीबिल्डिंग पोझ देताना दिसतो.
व्हिडिओत असे ही दिसते की, दोन ग्राउंड क्रू मेंबर्स विमानाच्या इंजिनासमोर छायाचित्रासाठी पोझ देत आहेत. व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, स्विस एअरलाइन्स प्रवक्ते मायकेल पेल्झर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही चौकशी करत आहोत. हे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. कारण व्हिडिओमध्ये जे मजेदार दिसते आहे ते अतिशय जीवघेणे आहे.'
ट्विट
दरम्यान, बोईंग 777 चे पंख सुमारे पाच मीटर [16.4 फूट] उंच आहेत. त्या उंचीवरून जर एखाता व्यक्ती जमीनवर पडला तर ते नक्कीच जीवघेणे ठरु शकते. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, क्रूने विमानाच्या पंखांवर पाय तेव्हाच ठेवायला हवेत, जेव्हा भयंकर अशी आणिबाणीची स्थिती निर्माण होते.