Budweiser Employee Peeing In Beer For 12 Years is FAKE News: बडवायजर कर्मचारी 12 वर्षांपासून बिअरमध्ये करत होता मूत्रविसर्जन? जाणून घ्या सोशल मिडियावर मजेशीर मिम्स आणि विनोद निर्माण करणा-या या व्हायरल बातमीमागचे सत्य
Budweiser Employee Peeing In Beer (Photo Credits: Twitter)

बिअरप्रेमींसाठी (Beer Lovers) अत्यंत महत्त्वाची बातमी! बडवायजर (Budweiser)चा कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरमध्ये मूत्रविसर्जन (Peeing) करत असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खोटी असून एका साइटने ही बातमी टाकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत या बातमीचे फोटो आणि ही बातमी सोशल मिडियावर वा-याच्या वेगाने पसरली. त्यामुळे ही बातमी व्हायरल (Viral) होताच अनेक नेटक-यांनी यावर मजेशीर मिम्स (Funny Memes) आणि विनोद बनवायला सुरुवात केली.

या बातमीमागे नेमकं सत्य आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेषत: बिअर प्रेमींना तर सर्वात जास्त उत्सुकता असणार. 'foolishhumour.com posted an article' या वेबसाईटने बडवायजर कंपनी ही गोष्ट मान्य करतात की, त्यांचा कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरच्या टँकमध्ये मूत्रविसर्जन करत होता अशी हेडलाईन देऊन बातमी केली होती. Walter Powell (नाव बदलण्यात आले आहे) या कर्मचा-याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले होते. काही देशात ही बिअर मोफत देण्यात आली होती. इतकंच नव्हे तर या कंपनीतील 750 कर्मचारी हे कृत्य करत असल्याचे या बातमीत म्हटले होते.

मात्र हा वेबसाइटच्या खाली एक disclaimer देण्यात आले होते ज्यात असे म्हटले होते की हे एक ह्यूमर पेज आहे. आमचा उद्देश लोकांना हसविणे हा आहे. हा लेख काल्पनिक असून वास्तवाशी याचा काही संबंध नाही. हा व्यंगात्मक लेख पुन्हा तयार केला गेला ज्याला अन्य वेबसाइटवर पोस्ट केले गेले.

Hans-article-on-Budweiser

मात्र हा लेख प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर नेटकरी मिम्स बनवू लागले.

पाहा मिम्स:

मिम्स:

पाहा ट्विट:

त्यामुळे हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असून याला गंभीरतेने घेऊ नका. यामुळे बिअर पिणा-या लोकांना या बातमीने काहीच काळजी करण्याचे कारण नाही.