Tourist Falls from Hotel Balcony: विष्टेने बरबटलेला ब्रिटीश पर्यटक हॉटेलच्या बाल्कनीतून पडला, कॅफेच्या छतावर लटकला

या धक्क्यामुळे तो खाली असलेल्या कॅफेच्या छतावर लटकला. तो मानवी विष्टेने बरबटला होता.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Thailand Hotel Incident: लँकेशायर येथील ब्लॅकबर्न येथील पॉल हॅडफिल्ड (Paul Hadfield) नावाचा 51 वर्षीय ब्रिटीश पर्यटक (British Tourist) हॉटेलच्या बाल्कनीतून पडल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना 4 नोव्हेंबरच्या पहाटे पटाया येथील हॉटेलमध्ये (Pattaya Balcony Fall) घडली. पोलिसांनी सांगितले की, हॅडफिल्ड हा अत्यंत मद्यधुंद झाला होता. नशेत तर्र असताना हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून तो खाली कोसळला आणि कॅफेच्या छतावर जाऊन पडला. ज्यामळे छत तुटले आणि तो अर्धवट अवस्थेत लटकला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. कॅफेच्या छतावर एक व्यक्ती विवस्त्र लटकत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. ज्यामुळे तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

इंटरनेटच्या छतात अडकला पर्यटक

आपत्कालीन स्थिती मागितलेल्या मदतीस तत्काळ प्रतिसाद देत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पॉल हॅडफिल्ड हा व्यक्ती हॉटेलच्या थेट खाली असलेल्या इंटरनेट कॅफेच्या छतावर अंशतः लटकत असलेल्या अवस्थेत आढळला. बचावकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लटकलेल्या अवस्थेत तो मदतीसाठी याचना करत होता. जखमेने विव्हळत होता. त्याला सुरक्षीत उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. उंचावरुन पडल्यामुळे तो चांगलाच जखमी झाला होता. (हेही वाचा, Viral Video: आश्चर्यकारक! रेल्वेत प्रवास करण्यासाठी प्रवाश्याने लढवली अनोखी शक्कल, व्हिडीओ पाहून बसेल धक्का)

पोलिसांनी पॉल हॅडफिल्ड राहात असलेली हॉटेलची खोली तपासली असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणावर मानवी विष्टा पसरली होती. सर्वत्र दुर्गंधी होती. जी पाऊन उपस्थितांना धक्का बसला. पोलिसांनी सांगितले की, त्याचे वर्तन संशयास्पद आहे. तो नेमका काय करत होता याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्याच्या खोलीत अशा विक्षिप्त बाबी आढळून आल्या असल्या तरी, त्याने काही बेकायदेशीर केल्याचे अद्याप तरी पुढे आले नाही. त्याने हॉटेलमध्ये काय करावे ही त्याची खासगी बाब आहे. (हेही वाचा, Viral Video: रात्रीच्या अंधारात घराच्या पायऱ्यांवर चालताना दिसली सिंहीनी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल)

प्राप्त माहितीनुसार, पॉल हॅडफिल्ड जेव्हा छतावर कोसळला तेव्हा छत फुटले आणि तो खाली आला. ज्यामुळे इंटरनेट कॅफेमध्ये बसलेले लोक घाबरले. लोकांनी कमरेपासून खालचे शरीर म्हणजे पाय लटकत असलेला एक मानवी देह पाहिला. ज्यामुळे उपस्थितांना प्रचंड धक्का बसला. पोलिसांनी म्हटले आहे की, हॅडफिल्ड याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मात्र, तो बरा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. ज्यामुळे तो कॅफे आणि हॉटेलची मालमत्ता यांच्या झालेल्या नुकसानभरपाई देण्यासाठी जबाबदार आहे किंवा नाही याबाबत माहिती घेतली जाईल. नागरिकांच्या मद्यधुंद असण्यामुळे अनेकदा आपत्कालीन स्थिती उद्भवते. ज्याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. तसेच यंत्रणेवरही कारणाशिवाय ताण वाढतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif