Brides Push-Ups in Heavy Lehenga: लग्नाच्या दिवशी जड लेहंगा, दागिने घालून नवरीने मारले पुश-अप्स; सोशल मिडियावर Video व्हायरल
Brides Push-Ups in Heavy Lehenga (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल इंटरनेट जगतात अनेक व्हिडिओ रातोरात व्हायरल होत असतात. यामध्ये लग्नाचे व्हिडिओही चवीने पाहिले जातात. इतर लोकांच्या लग्नामधील धमाल, मस्ती पाहायला अनेकांना आवडते. आपणही वधू-वरांचे बरेच मजेदार-विनोदी व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये लग्नाच्यावेळी तुम्ही बऱ्याचदा वधूला नाचताना पहिले असेल, मात्र तुम्ही कधी वधूला लग्नात व्यायाम करताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही नवरी चक्क आपल्या लग्नाच्या दिवशी पुशअप्स (Push-Ups) मारताना दिसत आहे.

या नवरीचे नाव आहे ऐना अरोरा (A\ana Arora) असून ती आहारतज्ज्ञ व मॉडेल आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ऐना जड लेहेंगा परिधान करून, दागिने घालून पुशअप्स करत आहे. यावरून हे दिसत आहे की नवरी आपल्या फिटनेसबाबत खरच खूप जागरूक आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आजकाल लोक त्यांच्या फिटनेसला खूपच सिरीयसली घेत आहेत. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिमला जाणे, फिरायला जाने किंवा धावायला जाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. आता आपल्या लग्नातही पुशअप्स मारणाऱ्या या नवरीचे बरेच कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by aana arora (@aan4490)

 

View this post on Instagram

 

A post shared by aana arora (@aan4490)

(हेही वाचा: कारमध्ये सेक्स करत असलेल्या दोन पोलिसांचा प्रवाशाने व्हिडिओ केला शूट, व्हायरल झाल्यानंतर केली 'ही' कठोर कारवाई)

सर्वसामान्यपणे नवरीचा लेहंगा हा फार जड असतो, त्यात दागिने घालून चालणेही अवघड ठरते. अशात ऐनाने चक्क पुशअप्स मारले आहेत. ऐनाचे इन्स्टाgram खाते पहिले तर लक्षात येईल की, फिटनेस हा तिच्या आयुष्यातील फार मोठा भाग आहे. तिने याआधी आपले अनेक वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.