Brazilian Bodybuilder Matheus Pavlak, 19, Dies: ब्राझिलियन बॉडीबिल्डर मॅथ्यूस पावलक यांचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन; स्टिरॉइड अतिवापरामुळे हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता

मोठ्या प्रमाणावर स्टिरॉइड (Steroid Use in Bodybuilding) घेतल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा.

Bodybuilder Matheus Pavlak | Photo Credits: instagram)

ब्राझीलीयन बॉडीबिल्डर (Brazilian Bodybuilder) मॅथ्यूस पावलक (Matheus Pavlak) याचे वयाच्या केवळ 19 व्या वर्षी निधन (Brazilian Bodybuilder Dies) झाले आहे. त्याचा मृतदेह त्याच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना (Santa Catarina News) येथील राहत्या घरी रविवारी दुपारी आढळून आला. प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आहे. पावलाक हा शरीर सौष्ठव (Bodybuilding) क्षेत्रातील उगवता तारा म्हणून ओळखला जात असे. अनेक स्पर्धांमध्ये त्याने पदके जिंकली होती. त्यासाठी त्याने पाठिमागील पाच वर्षांमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक वेळा परिवर्तन केले होते. सांगितले जात आहे की, तो मोठ्या प्रमाणावर स्टिरॉइड (Steroid Use in Bodybuilding) ही घेत असे.

लठ्ठपणाला कंटाळून बॉडीबिल्डींग

मॅथ्यूस पावलक हा बॉडीबिल्डर होण्यापूर्वी त्याच्या लठ्ठपणासाठी प्रसिद्ध होता. मात्र, लठ्ठपणाला कंटाळून त्याने शरीरसौष्ठव म्हणजेच बॉडीबिल्डींग करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो अनेक तास जीममध्येच व्यतीत करत असे. ज्यामुळे त्याच्या शरीराला विशिष्ठ आकार आला. लठ्ठपणाही लोप पावला. लठ्ठपणावर मात करून स्पर्धात्मक शरीरसौष्ठवपटू बनण्यापर्यंतच्या पावलकच्या प्रवासामुळे त्याला प्रादेशिक स्पर्धांमध्ये ओळख मिळाली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याने अलीकडेच प्रादेशिक स्पर्धांमध्ये चौथे आणि सहावे स्थान मिळवले आणि 2023 मध्ये U23 स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्या गावी "मिस्टर ब्लूमेनू" ही पदवी जिंकली. (हेही वाचा, Bodybuilder Divorced Sex Doll Wife: बॉडीबिल्डर Yurii Tolochko याचा सेक्स डॉल पत्नीसोबत घटस्फोट)

बॉडीबिल्डिंगसाठी स्टिरॉइडचा वापर

तरुण ऍथलीटच्या आकस्मिक मृत्यूमुळे बॉडीबिल्डींग ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सच्या अतिवापराबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अनेक तरुण स्टिरॉइड अधिक प्रमाणात घेत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मॅथ्यूस पावलाक यांच्या बॉडीबिल्डींगवर संशय व्यक्त केला. त्याचे वय (19 वर्षे) आणि त्याने कमावलेले शरीर आणि त्याला स्पर्धांमध्ये मिळालेले यश पाहता, एवढ्या लहान वयात पावलाकची उल्लेखनीय शरीरयष्टी कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांच्या वापराद्वारे प्राप्त झाली असावी, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी दिली. कदाचित त्याला अकाली हृदयविकाराचा झटका आला असेल, असेही काहींनी म्हटले आहे.

पावलाकच्या मृत्यूमुळे हळहळ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Lucas Chegatti (@chegatti_treinador)

सोशल मीडियवर जगभरातील चाहते

मॅथ्यूस पावलाक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होता. तो आपल्या बॉडीचे जाहीर प्रदर्शन करत असे. वेगवेगळ्या पोझमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन तो आपल्या चाहत्यांना खूश करत असे. त्याचा चाहता वर्गही मोठा होता. जो त्याच्या फॉलोअर्सच्या माध्यमातून गणला जाई. पावलकने यापूर्वी सोशल मीडियावर आपले प्रेरणादायी शरीर परिवर्तन शेअर केले होते, त्याच्या एका पोस्टला कॅप्शन दिले होते, "तुमचे स्वप्न कितीही कठीण किंवा अशक्य असले तरीही, तुम्हाला ते खरोखर हवे असल्यास, तुम्ही तेथे पोहोचाल. मी ते केले आहे."

पावलाकचे माजी प्रशिक्षक, लुकास चेगाट्टी यांनी आपल्या विद्यार्थ्याला गमावल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. चेगट्टीने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहिले की, आजचा दिवस एका महान मित्राच्या, एका नेत्रदीपक तरुणाला गमावल्याच्या दु:खद संपला आहे. ज्याने आम्हाला खूप लवकर सोडले. त्याच्या जाण्याने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल होते. त्याच्या जाण्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत.