Student Beaten Viral Video: महाविद्यालयीन तरुणांची विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओत काही तरुण एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, चार विद्यार्थ्यां वसतिगृहाच्या खोलीत दुसर्‍या एका विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण करत आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे.

Student Beaten Viral Video | (Photo Credits: You Tube)

महाविद्यालयीन तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत काही तरुण एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Beating Video) आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात असलेल्या भीमावरम येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ( Bhimavaram SRKR Engineering College) असल्याचे सांगण्यात येत आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओत पाहायला मिळते की, चार विद्यार्थ्यां वसतिगृहाच्या खोलीत दुसर्‍या एका विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण करत आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली आहे.

व्हिडिओत पाहायला मिळते की, मारहाण होत असताना पीडित विद्यार्थी हात जोडतो आहे. वारंवार क्षमा मागत आहे. तरीही हे विद्यार्थी त्याला मारहाण सुरुच ठेवतात. झालेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा शर्टही फाटला आहे. तसेच, त्याला मुक्कामारही लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना कालांतराणे उघडकीस आली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि इतर तरुण एसआरकेआर अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातील वादाचे निश्चित कारण समजू शकले नाही. (हेही वाचा, Teacher Viral Video: शिक्षकांपुढे अतिशाहणपणा चालत नसतो, वात्रट विद्यार्थ्याला बदडतानाचा व्हिडिओ व्हायरल)

ट्विट

दरम्यान, पीडित तरुणाे नाव अंकीत असल्याचे समजते. अत्यंत क्रूरपणे झालेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या शरीराव जखमाही झाल्या आहेत. त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान, या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. प्राचार्य डॉ. एम जगपती राजू किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापनाने अद्याप या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियात मात्र या घटनेवरुन जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणाचा तपास करुन दोषींना योग्य ती शिक्षा द्यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरणार नाही. तसेच, पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही, अशी मागणीही केली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif