IPL Auction 2025 Live

Viral Video: Bengaluru मध्ये कचरा वेचाणार्‍या महिलेचा अस्खलित आणि भावस्पर्शी अंदाजातील English Speaking Skill चा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

Shachina Heggar सोबत बोलताना ही महिला गातानादेखील दिसली.

Cecilia Margaret Lawrence (Photo Credits: Instagram)

बेंगलूरू (Bengaluru) मध्ये कचरा वेचणार्‍या एका महिलेलं इंग्लिश स्पिकिंग स्किल आणि भावस्पर्शी आवाज सध्या सोशल मीडीयामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. इंस्टाग्राम वर Shachina Heggar या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडिओ मधील महिलेचं नाव Cecilia Margaret Lawrence आहे. अस्खलित आणि खास अंदाजात संवाद साधणार्‍या या महिलेने आपण 2007-14 अशी सात वर्ष जपान मध्ये वास्तव्य केल्याचंही म्हटलं आहे.

Cecilia या बेंगळूरू च्या सदाशिवनगर भागात कचरा वेचताना आढळल्या. Shachina Heggar सोबत बोलताना ही महिला गातानादेखील दिसली. तर Shachina Heggar ने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करताना,' कहाण्या आपल्या आजूबाजूलाच असतात. आपल्याला फक्त फक्त थांबून पहाव्या लागतात. काही सुंदर आणि काही हृद्यस्पर्शी असतात.' अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. Bangalore च्या Residency Road परिसरात भिंतींवर Gender Equality, महिला सक्षमीकरणाचे संदेश; पहा या ग्रॅफिटीचे फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shachina Heggar (@itmeshachinaheggar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shachina Heggar (@itmeshachinaheggar)

सध्या Cecilia चा व्हिडीओ सोशल मीडीयावर वायरल झाला आहे. नेटकरी देखील तिच्या अंदाजाने थक्क झाले आहे. अनेकांना Cecilia चं बोलणं मनाला भिडणारं वाटलं आहे. काही युजर्सनी Cecilia ही बेंगलूरू च्या Holy Ghost Church मध्ये रविवारची येत असल्याची बाब देखील सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cecilia'Ed (@ceciliaed_always)

इंस्टाग्राम वर 'ceciliaed_always'हे तिचं पेज देखील आहे. यामध्ये ती काही आर्ट ग्रुप सोबत काम करत असल्याचंही दिसली आहे. नुकत्याच एका पोस्ट मध्ये तिने जांभळा सिक्विन ड्रेस घातला आहे. याला कॅप्शन मध्ये 'तुम्हांला जीवनाने टोमॅटो दिलेत तर त्याचं मस्त पेपरी टोमॅटो रसम' बनवायला विसरू नका असे ती म्हणाली आहे.