बेळगाव: खेळण्याच्या नादात मुलाने पकडला साप; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video)

खेळता खेळता मुलगा साप पकडायला जातो. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Boy holds Snake Viral Video | (Photo Credits: Twitter)

निरागसतेतून लहान मुलं करत असणारी मस्ती कधीकधी जीवावर बेतू शकते. त्यामुळे त्यांच्याकडे जरा देखील दुर्लक्ष करुन चालत नाही. थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास काय गोंधळ होऊ शकतो, याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून येईल. हा व्हिडिओ बेळगाव (Belgaum) मधील कंगाळी बुद्रूक (Kangali Budruk) गावातील आहे. मोळक्या शेतात खेळत असलेल्या मुलाचा व्हिडिओ वडील शूट करत असतात. खेळता खेळता मुलगा साप पकडायला जातो. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोकळ्या शेतात मस्ती करताना खाली काही दिसलं म्हणून कुतुहूलापोटी मुलगा ते उचलायला जातो. तो साप आहे हे लक्षात येताच वडील लगचेच मुलाजवळ धाव घेतात, हे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र सुदैवाने मुलाला कोणतीही इजा होत नाही आणि साप आपल्या मार्गाने निघून जातो. (तामिळनाडू: कोयंबटूर येथील एटीएम मध्ये सापडला साप; अशी केली सुटका, Watch Video)

पहा व्हिडिओ:

आजकाल मोबाईलमध्ये आपण इतके गुंततो की अगदी नकळत आपले मुलांकडे दुर्लक्ष होते. पण मिनिटाभराचे दुर्लक्षही जीवावर बेतू शकतं. त्यामुळे  सतत डोळे उघडे ठेवून मुलांवर लक्ष ठेवायला हवं हे या व्हिडिओतून स्पष्ट होतं. अनेक पालकांसाठी हा व्हिडिओ बोध देणारा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif