Baghpat Viral Video: तरुणाने फेकलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे रस्त्यावरच उलटली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडिओ एका ऑटो रिक्षा (Rickshaw ) अपघाताचा आहे. जी ऑटो केवळ तरुणाने पाण्याने भरलेला फुगा रिक्षावर मारताच उलटली आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत (Baghpat Viral Video) येथील एक व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका ऑटो रिक्षा (Rickshaw ) अपघाताचा आहे. जी ऑटो केवळ तरुणाने पाण्याने भरलेला फुगा रिक्षावर मारताच उलटली आहे. होळी साजरी करताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. वेगवान रिक्षा उलटल्यावर रस्त्यावरुन काही फुटांपर्यंत फरफटत गेली. ही घटना पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याचे जाणवते. उलटलेल्या रिक्षाला मदत करण्यासाठी आणि त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठीही अनेक नागरिक मदत करताना व्हिडिओत पाहायला मिळतात.
व्हिडिओत पाहायला मिळते की, काही युवक रस्त्याच्या कडेला होळी साजरी करत आहेत. होळी साजरी करताना रस्त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु आहे. दरम्यान, एक रिक्षा भरधाव वेगाने रस्त्यावरुन निघाली आहे. इतक्यात एक तरुण पाण्याने भरलेला फुगा या रिक्षाच्या दिशेने भिरकातो. फुगा भिरकावल्याच्या पुढच्या काहीच क्षणामध्ये पाहायला मिळते की रिक्षाचा तोल गेला आहे आणि फरफटत जाऊन ती उलटते. सांगितले जाते आहे की, अचानक मारला गेलेल्या फुग्यामुळे रिक्षाचालक जोराद घाबरतो. त्यामुळे त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटते आणि रिक्षा उलटते. ही रिक्षा प्रवाशांनी भरली होती. (हेही वाचा, Aurangabad: पेट्रोल-डिझेल परवडत नाही, औरंगाबदचा तरुण कामावर जाण्यासाठी वापरतो घोडा; व्हिडिओ व्हायरल)
ट्विट
रिक्षा उलटल्याचे पाहायला मिळताच पाण्याने भरलेला फुगा फेकणारा तरुण ओरडत पळताना दिसतो. दरम्यान, रिक्षा उलटल्याचे स्थानिकांच्या लक्षात येते. ते धावत जाऊन रिक्षातील प्रवाशांना वाचविण्यासाठी धावतात. रिक्षात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणती जीवित हानी झाली नाही. परंतू, अनेकांना मुकामार चांगलाच लागला आहे.