दिल्ली: बाबांच्या भावूक व्हिडिओनंतर 'Baba Ka Dhaba' ला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद; पहा फोटोज आणि व्हिडिओज

#BabaKaDhaba हे ट्विटरमध्ये टॉप ट्रेंडिगमध्ये होते.

Baba Ka Dhaba in Delhi (Photo Credits: Twitter)

दिल्ली मध्ये राहणाऱ्या एका 80 वर्षीय दांपत्यांची कोरोना व्हायरस संकट काळात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या दांमत्याचा दिल्लीतील रस्त्यावर एक ढाबा आहे. कोरोना व्हायरस संकट काळात त्यांचा हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. याची माहिती दिल्लीकरांना एका व्हायरल व्हिडिओतून मिळाली. त्यानंतर बाबा का ढाबा ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसंच बाबा का ढाबाला भेट देऊन तृप्त झालेले लोक #BabaKaDhaba ने सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इंटरनेटच्या मदतीने बाबा का ढाबा हा प्रसिद्ध झाला असून लोकांच्या प्रतिसादाबद्दल या दांपत्याने आभार मानले आहेत. तसंच शहारातील इतर स्थानिक विक्रेत्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

दिल्लीतील मालवीय नगर मधील हनुमान मंदिराच्या समोर हा ढाबा आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला आणि रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या दांपत्यासमोर उभा राहिला. अनलॉकिंगला सुरुवात झाल्यानंतरही कोविड-19 संकटामुळे ग्राहक ढाब्याच्या दिशेने येत नव्हते. त्यामुळे भावूक झालेल्या या बाबांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर दिल्लीकरांनी आज सकाळपासूनच ढाब्यावर गर्दी केली आहे. Madhur (@ThePlacardGuy) आणि Ashutosh (iashutosh23) यांनी बाबांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आज सकाळी आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी सुद्धा स्टॉलला भेट देत यांसारख्या इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले. आतापर्यंत अनेकांना बाबा का ढाबाला भेट दिली असून व्हिडिओज आणि फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत. #BabaKaDhaba हे ट्विटरमध्ये टॉप ट्रेंडिगमध्ये होते.

पहा व्हिडिओ:

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बाबा आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरील हास्य अनमोल आहे. सोशल मीडियाचा वापर आपण अशा प्रकारच्या चांगल्या कामसाठी देखील करु शकतो. तसंच या घटनेतून सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. दरम्यान, स्थानिक विक्रेत्यांना मदत करण्याचे संदेशही ही घटना आपल्याला देते.