RamRam Cheque: अयोध्या मधील भव्य राम मंदिरासाठी देणगीचा अनोखा चेक; 'रामराम' लिहित साकाराली दानाची किंमत (See Pic)

सोशल मीडियावर राम मंदिरासाठी आलेला देणगीचा एक चेक व्हायरल होत आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील रक्कमेचा अंक चक्क 'रामराम' असा लिहिण्यात आला आहे.

RamRam Cheque (Photo Credits: Twitter)

अयोध्या (Ayodhya) येथे निर्माण होणाऱ्या राम मंदिरासाठी (Ram Mandir) देणगी घेण्याचे अभियान सुरु होते. 44 दिवसांचे हे अभियान शनिवार समाप्त झाले. दरम्यान, सोशल मीडियावर राम मंदिरासाठी आलेला देणगीचा एक चेक व्हायरल होत आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील रक्कमेचा अंक चक्क 'रामराम' (RamRam) असा लिहिण्यात आला आहे. खरंतर ही रक्कम 2,14,214 रुपये इतकी आहे. मात्र क्रिएटीव्हीटीचा वापर करत या अंकामधून रामराम असे लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यामुळे हा चेक अवैध ठरत नाही. कारण रक्कमेचे अंक योग्य पद्धतीत लिहिले आहे. या अनोख्या चेकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

अयोध्यामधील राम मंदिरासाठी निधी उभारणी संबंधित ट्रस्टने सांगितले की, देणग्यांमध्ये 2,100 कोटींपेक्षा जास्त रुपये प्राप्त झाले आहेत. 15 जानेवारी पासून राम मंदिरासाठी देगणी स्वीकारण्याची मोहिम सुरु झाली होती. 44 दिवसांनंतर काल अखेर ती समाप्त झाली.

पहा फोटो:

 

"भारतातील दुर्गम खेड्यांमधील रहिवाशांसह सर्व धार्मिक वर्गाच्या उदार योगदानामुळे निधी जमा करण्याची मोहीम संपुष्टात आली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत मिळालेली देणगी 2100 कोटी रुपयांहून अधिक दान मिळाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रामजन्मभूमी येथे संपूर्ण संकुलाच्या बांधकामाचा अंदाज 1,100 कोटी रुपये होता. तर मंदिराच्या बांधकामासाठी 300 ते 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, राम मंदिर कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे बजेट अंतिम नसून बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच हे कळेल, असे ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement