Viral Video: कोविड-19 चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी रिक्षाचालकाने आपल्या रिक्षातच बसवले वॉश बेसिन, पाहा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये रिक्षावाला रिक्षा चालवत आहे. त्याच्या मागे असलेल्या प्रवासी आसनाजवळ एक वॉश बेसिन लावलेले दिसत आहे. त्यावर हँड वॉश आणि पाण्याची बॉटलही दिसत आहे
संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूशी लढत आहे. अशातच या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासोबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. वारंवार हात सॅनिटायजर (Sanitizers) ने स्वच्छ धुणे हे देखील प्रशानसनाकडून सांगण्यात येत आहे. अनलॉक 1 मध्ये सुरु झालेल्या दुकानांमध्ये सुद्धा सॅनिटायजर आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मास्क (Mask) पासून सॅनिटायजरपर्यंत लोकही एकाहून एक सरस उपाय शोधून काढत आहे. त्यात एका रिक्षाचालकाचा (Auto Rickshaw Driver) व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात या रिक्षावाल्याने चक्क आपल्या रिक्षातच वॉश बेसिन बसवला आहे. या सोबतच एक पाण्याची बॉटलही ठेवली आहे.
रिक्षाचालकाची ही भन्नाट कल्पना सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हारल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षावाला रिक्षा चालवत आहे. त्याच्या मागे असलेल्या प्रवासी आसनाजवळ एक वॉश बेसिन लावलेले दिसत आहे. त्यावर हँड वॉश आणि पाण्याची बॉटलही दिसत आहे. No Maska Only Mask: तुम्ही आण मास्क म्हणजे जसे की वडा, भुर्जी, भजी सोबत पाव; Coranavirus जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांचा हटके संदेश
पाहा व्हिडिओ:
या व्हिडिओखाली एक कॅप्शन लिहिले आहे ज्यात असे म्हटले आहे की, "कोरोना व्हायरसचे धोका पत्करू नका." हा व्हिडिओ 15 जूनला सोशल मिडियावर शेअर कऱण्यात आला. ज्याला लोकांनी प्रचंड पसंत केले आहे.
भारतात गेल्या 24 तासांत भारतात 14,821 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 25 हजार 282 वर जाऊन पोहोचली आहे. त्यासोबतच काल (21 जून) दिवसभरात 445 रुग्ण दगावले असून देशात मृतांचू एकूण संख्या 13,699 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.