Aurangabad: पेट्रोल-डिझेल परवडत नाही, औरंगाबदचा तरुण कामावर जाण्यासाठी वापरतो घोडा; व्हिडिओ व्हायरल
शेख युसूफ (Aurangabad Man Shaikh Yusuf) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण कामावर जाण्यासाठी चक्क घोडा (Horse) वापरतो. दररोज तो आपल्या 'जिगर' (Jigar Horse) नावाच्या घोड्यावर बसतो आणि कामाला जातो. जिगरच्या पाठीवर बसून कामाला जाणाऱ्या युसुफचा व्हडिओ आता सोशल मीडियावरही ( Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
महागाई (Inflation) दिवसेंदिवस उच्चंक गाठत आहे. पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol Diesel) किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहन वापरणे अशक्य होऊन बसले आहे. यावर औरंगाबाद (Aurangabad) येथील तरुणाने नामी शक्कल लढवली आहे. शेख युसूफ (Aurangabad Man Shaikh Yusuf) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण कामावर जाण्यासाठी चक्क घोडा (Horse) वापरतो. दररोज तो आपल्या 'जिगर' (Jigar Horse) नावाच्या घोड्यावर बसतो आणि कामाला जातो. जिगरच्या पाठीवर बसून कामाला जाणाऱ्या युसुफचा व्हडिओ आता सोशल मीडियावरही ( Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. औरंगाबाद येथील नागरिकांमध्ये युसुफ आणि त्याच्या 'जिगर' घोड्याबद्दल कुतुहल आहे.
औरंगाबाद येथील शेख युसूफ सांगतो की, तो आपल्या 'जिगर' या घोड्यावर बसून कामाला जातो. "मी ती लॉकडाऊनच्या काळात विकत घेतला होती. माझी बाईक चालू नव्हती, त्यातच पेट्रोलचे दर प्रचंड वाढले होते आणि सार्वजनिक वाहतूकही सुरु नव्हती. त्यामुळे तेव्हाच निर्णय घेऊन प्रवासासाठी मी हा घोडा 40,000 रुपयांना विकत घेतला होता. मी आता प्रवासासाठी गाडी न वापरता घोडाच वापरतो', असे तो सांगतो. (हेही वाचा, Indian Wedding Funny Moments Video: घोडा बिथरला, नवरदेवाला घेऊन पळाला; पाहा व्हिडिओ )
ट्विट
जेव्हा वाहतुकीसाठी वाहन वापरले जात नव्हते. तसेच, प्रवासासाठी यांत्रिक वाहनांचा वापर मर्यादित स्वरुपात होता तेव्हा घोडा हेच वाहन प्रामुख्याने वापरले जात होते. मात्र, पाठिमागील काही वर्षांमध्ये यांत्रिकीकरणाने वेग घेतला. अत्याल्प किमतींमध्ये वाहने सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे प्रवास अथवा वाहतुकीसाठी घोडा वापरण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले. मात्र, आता महागाई आणि इतकी वाढली आहे की सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीही आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा घोडा काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही.