IPL Auction 2025 Live

असाही एक देश, जिथे भरते चक्क गोगलायींची धावण्याची स्पर्धा, विजेत्यास मिळते जबरदस्त बक्षीस

पूर्व इंग्लंडच्या नॉरफ्लॉक काऊंट येथे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात तब्बल १५० गोगलगाईंनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.

गोगलगाई (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

जगाच्या पाठीवर एक असाही देश आहे, ज्या देशात भरते चक्क गोगलगायीची स्पर्धा. होय, तुम्ही योग्य तेच वाचले. विश्वास नाही ना बसला? चला आम्ही सांगतो काय आहे हा प्रकार. तर, मंडळी ही आहे एक 'गोगलगायींच्या धावण्याची स्पर्धा' अर्थातच स्नेल रेसिंग कॉम्पीटीशन. आणि, ही स्पर्धा भरते एकेकाळी जगावर राज्य केलेल्या इंग्लंड या देशात. सुमारे सन १०६०च्या दशकापासून या देशात ही स्पर्धा सुरु झाली. पूर्व इंग्लंडच्या नॉरफ्लॉक काऊंट येथे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात तब्बल १५० गोगलगायींनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.

कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्पर्धेत बाजी

विशेष असे की, नुकत्याच पार पडलेल्या गोगलगायींच्या धावण्याच्या स्पर्धेचा निकालही लागला. यात लॅरी नावाच्या गोगलगायींने बाजी मारली. लॅरीने २ मिनिटांत २२ सेंटीमिटर इतके अंतर कापले. लॅरीचे यश पाहून तिची मालकीन तारा बीसले खूप खूश झाली. तिने आनंदाच्या भरात गोगलगायीला तीन द्राक्षे खायला दिले. गंमत म्हणजे , लॅरा गोगलगायीनेही मालकीनीकडून मिळालेल्या बक्षिसाची मजा घेतली. दरम्यान, लॅरीने गेल्याही वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. मात्र, यंदा तिला गतवर्षाचा तिचाच विक्रम मोडता आला नाही. लॅरीने गेल्या वर्षी याच स्पर्धेत हेच अंतर केवळ २ मिनिटांत पार केले होते. तिची मालकीन तारा बिसले सांगते की, कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय लॅरीने ही कामगिरी केली आहे.

चांदीचा कप बक्षीस

आणखी एक विशेष असे की, या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला चक्क चांदीचा एक चमकता चषक दिला जातो. ज्याच्यात काही झाडांची पाने आणि फळेही असतात. या चषकावर यंदा लॅरीचे नाव कोरले गेले. स्पर्धेत उतरण्यापूर्वी स्पर्धक गोगलगायींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांना ओल्या कपड्यांमध्ये ठेवतात. तसेच, स्पर्धेदरम्यान काही दुखापत वैगेरे होण्याची शक्यता गृहीत धरून अन्न आणि औषधांचीही व्यवस्था ठेवण्यात येते. ठरवू दिलेले लक्ष कसे पार करायचे याबाबत गोगलगाईंना खास प्रशिक्षण दिले जाते.