कंट्रोल.. उदय.. कंट्रोल! केजरीवाल यांच्यावरचे हे स्पूफ पाहून तुम्हीही हसाल खळखळून (व्हिडिओ)

दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे की, स्वत: अरविंद केजरीवाल यांनाही हा व्हिडिओ भलताच आवडला आहे.

अरविंद केजरीवाल (संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

आजकाल राजकारण पूर्वीसारखे राहिले नाही. पूर्वी नेता लोक व्यासपीठावरुन लांबलचक भाषणे द्यायचे. विरोधकांना नामोहरण करायचे. भाषणांमधून टीका, विनोद आणि उपहास यांचा ते शस्त्रासारखा वापर करायचे. आता काळ बदलला. राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही हातात सोशल मीडियासारखे शक्तीशाली हत्यार आले. या हत्यारावर प्रभूत्व मिळवले की, विरोधकांना गारद करता येते. तसेच, थेट सत्तेच्या तख्तापर्यंतही पोहचता येते, हे पहायला मिळाले. त्यामळे सोशल मीडियावरुन थेट एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानही दिले जाऊ लागले. यातूनच नेत्यांचे फनी व्हिडिओ, फोटो, स्पूफ आदी गोष्टी शेअर केल्या जाऊ लागल्या. अर्थात, या सर्वांत टीका आणि समर्थन अशा बाजू असल्या तरी, कधीमधी काही मजेशीर व्हिडिओही पहायला मिळू लागले. जसे की अरविंद केजरीवाल यांच्याबाबतचे हे एक स्पूफ. तुम्हीही हे स्पूफ पाहाल तर, तुम्हालाही हसू आवरणे कठीण होईल. भलेही वेलकम चित्रपटातील नाना पाटेकरप्रमाणे तुम्ही स्वत:ला 'कंट्रोल उदय कंट्रोल' म्हणालात तरीसुद्धा.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एक असे व्यक्ती आहेत, ज्यांना सोशल मीडिया कसा हाताळायचे हे चांगले माहिती आहे. तसेच, ते स्वत:ही सोशल मीडियात चर्चेत असतात. कधी राजकीय कारणांमुळे, कधी त्यांनी स्वत:च केलेल्या वक्तव्यामळे तर कधी विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे. आता तर असे दिसते की, सोशल मीडियाची अरविंद केजरीवाल यांना इतकी सवय झाली आहे की, त्यांच्यावर विनोद झाला तर, ते रागावत नाहीत. उलट, हसून त्याला दाद देतात. कधी कधी तर, त्यांच्यावर विनोद करणारे एखाद्याचे ट्विट ते रिट्विटही करतात.

(photo: screen shoot twitter)

दरम्यान, एक व्हिडिओ गेल्या काही काळापासून भलताच चर्चेत आला आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे की, स्वत: अरविंद केजरीवाल यांनाही हा व्हिडिओ भलताच आवडला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif