Angry Tiger Viral Video: वाघ चिडला, डरकाळी फोडत पर्यटकांवर झेपावला; जिम कॉर्बेट जंगलातील व्हिडिओ व्हायरल
काहींना वाघ दिसतो काहींना दिसत नाही. अनेक लोक एखाद्या प्राणीसंग्रहालयात वाघ पाहतात. पण अनेकदा हे लोक वाघ केवळ शांत आणि संयमी रुपात पाहता. पण जेव्हा हाच वाघ जेव्हा चिडतो तेव्हा मात्र पाहणारांची पळताभूई थोडी होते.
Angry Tiger Viral Video: व्याघ्र दर्शन घडावे म्हणून अनेक लोक जंगल सफरीवर जातात. काहींना वाघ दिसतो काहींना दिसत नाही. अनेक लोक एखाद्या प्राणीसंग्रहालयात वाघ पाहतात. पण अनेकदा हे लोक वाघ केवळ शांत आणि संयमी रुपात पाहता. पण जेव्हा हाच वाघ जेव्हा चिडतो तेव्हा मात्र पाहणारांची पळताभूई थोडी होते. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (Jim Corbett National Park) जंगलातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक वाघ डरकाळी फोडत पर्यटकांच्या वाहनावर झेपावताना दिसतो आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ उत्तराखंड राज्यातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उद्यानातील आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, पट्टेरी वाघ जेव्हा चिडतो काय होते पाहा. प्रत्येकाला नेमून दिलेल्या निवासामध्ये जर लोक हक्काचे घर म्हणून घुसले तर तुम्ही काय कराल?
पर्यटकांचे एक वाहन जंगल सफर करत असताना काही पर्यटक वाघाचे फोटो काढत होते. दरम्यान, एक वाघ झुडपातून अचानक झेप घेत बाहेर आला. डरकाळी फोडत वाघ बाहेर येताच पर्यटकांची घाबरगुंडी उडते. त्यांच्यातील संवादाचा काही भागही व्हिडिओदरम्यान ऐकायला मिळतो. (हेही वाचा, Video: एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांचा पाठलाग करणारा बिबट्याचा व्हिडीओ, IFS अधिकाऱ्याने केला शेअर)
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यातील एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे 1936 मध्ये हेली नॅशनल पार्क म्हणून स्थापित केले गेले आणि नंतर सुप्रसिद्ध संरक्षक, निसर्गवादी आणि लेखक जिम कॉर्बेट यांच्या सन्मानार्थ त्याचे नामकरण करण्यात आले. हे उद्यान 520 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापते आणि वाघ, हत्ती, बिबट्या, हरीण आणि असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींसह विविध वन्यजीवांचे निवासस्थान आहे.
हे उद्यान वाघांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ओळखले जाते आणि भारतातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. हे वन्यजीव प्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, पक्षी निरीक्षण, निसर्ग चालणे आणि जीप सफारीसाठी संधी देते.
ट्विट
वन्यजीवांव्यतिरिक्त, हे उद्यान त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे, त्यात घनदाट जंगले, डोलणाऱ्या टेकड्या आणि सुंदर नद्या आहेत. अभ्यागतांसाठी हे उद्यान पाच झोनमध्ये विभागले गेले आहे, प्रत्येक उद्यानातील वनस्पती आणि जीवजंतूंचा अनोखा अनुभव देतो.
एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असण्यासोबतच, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे संशोधन आणि संवर्धन केंद्र देखील आहे. उद्यानात विविध संशोधन कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे तेथील वन्यजीवांचे पर्यावरण आणि वर्तन यांचा अभ्यास केला जातो आणि उद्यानाच्या विविध परिसंस्थांचे दीर्घकालीन अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.