Andhra Pradesh: कारच्या बोनेटमध्ये सापडला आठ फुटाचा साप; बघ्यांची गर्दी, प्रवाशांमध्ये घबराट
अचानक गाडीत साप पाहायला मिळाल्याने कार चालक आणि आणि गाडीतील प्रवासी घाबरुन गेले. स्थानिकांच्या मदतीने कारच्या इंजिनमध्ये लपलेला हा साप काढण्यात यश मिळाले.
Snake in Car Bonnet: जंगल परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरुन धावणाऱ्या एका कारमध्ये चक्क आठ फुटाचा साप आढळून आला. ही घटना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील तिरुमाला (Tirumala) येथे गुरुवारी घडली. अचानक गाडीत साप पाहायला मिळाल्याने कार चालक आणि आणि गाडीतील प्रवासी घाबरुन गेले. स्थानिकांच्या मदतीने कारच्या इंजिनमध्ये लपलेला हा साप काढण्यात यश मिळाले. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी रस्त्यावर झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर जंगल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील रस्त्यावरुन एक चालक आणि काही प्रवासी कारमधून (TSOBUD8557) प्रवास करत होते. दरम्यान, कारमध्ये त्यांना अचानक एक भलामोठा साप दिसला. साप पाहून चालकासहीत गाडीतल प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली. चालकाने कार कशीबशी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधला. (हेही वाचा, तामिळनाडू: कोयंबटूर येथील एटीएम मध्ये सापडला साप; अशी केली सुटका (Watch Video))
कारच्या बोनेटमध्ये साप, युट्युब व्हिडिओ
दरम्यान, काही वेळात वन अधिकरी घटनास्थळी आले. त्यांनी कारची पाहनी करुन सापचा शोध घेतला. बारकाईने शोध घेतल्यावर साप कारच्या इंजिन असलेल्या भागात असल्याचे ध्यानात आले. अधिकाऱ्यांनी सापाला अलगत बाहेर काढले. सापाची उंची मोजली असता ती आठ फूट इतकी भरली. हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.