Amazon वर तीन हजारात विकली जात आहे चक्क नारळाची करवंटी; सोशल मिडियावर नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्स
याची मूळ किंमत आहे चक्क तीन हजार रुपये, 55 % सूट ही करवंटी सध्या 1,289.99 रुपयांना विकली जात आहे
‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आजकाल हटके, फॅशन, ट्रेंड्स अशी लेबले लावून काहीही विकले जाते. सध्याच्या ‘ऑरगॅनीक’ गोष्टींवर भर असलेल्या युगात तर अशा गोष्टी आव्वाच्या सव्वा दरात विकल्या जातात. यात अमेझॉन तर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनने शेणाच्या गोवऱ्या विकल्या होत्या, आता अमेझॉन चक्क नारळाची करवंटी विकत आहे. याची मूळ किंमत आहे चक्क तीन हजार रुपये, 55 % सूट ही करवंटी सध्या 1,289.99 रुपयांना विकली जात आहे. (हेही वाचा : Amazon चा वर्षातील पहिला बंपर सेल; 80 टक्के सवलतींसह या आहेत ऑफर्स)
नारळाच्या करवंटीसारखी गोष्टही आपण चक्क 3000 रुपयांमध्ये विकू शकतो, हे कोणाच्याही डोक्यात आले नाही. आता ही गोष्ट अमेझॉनने करून दाखवली आहे, अमेझॉनने या उत्पादनाला नाव दिले आहे Natural Coconut Shell Cup म्हणजेच नैसर्गिक नारळाची करवंटी. आश्चर्य म्हणजे लोक ही करवंटी खरेदीही करत आहेत. मात्र हे पाहून अमेझॉन पुन्हा एकदा ट्रोल होण्यास सुरुवात झाली आहे. या गोष्टीबाबत लोक सोशल मिडियावर विविध कमेंट्स करत आहेत.
मागे एकदा असाच एक फाटलेला शर्ट बेंगलोरच्या मॉलमध्ये विकला जात होता, त्यावेळी अशाच प्रतिक्रिया उमटल्या होत्या.