Head Stuck Inside Pressure Cooker: प्रेशर कुकरमध्ये अडकले लहान मुलाचे डोके, डॉक्टरांनी केली सुटका (Watch Video)

ज्यामुळे मुलाला थेट डॉक्टरांकडे घेऊन जावे लागले. डॉक्टरांनी प्रयत्न करुन पाहिला. मात्र, साध्या प्रयत्नांना यश येत नसल्याचे पाहताच डॉक्टरांनी कुकर कापून मुलाचे डोके आणि ते लहान मुल सुरक्षीत वाचवले. हसन रझा असे या मुलाचे नाव आहे. अगरा (Agra) शहरात खाती पाडा (Khati Pada) परिसरात ही घटना घडली

Head Stuck Inside Pressure Cooker | (Photo Credit: Youtube)

लहान मुलांचे खेळ (Kids Games) अनेकदा मोठ्यांसाठी डोकेदुखी (Headache) होऊन बसतात. केवळ मोठ्यांसाठीच नव्हे तर काही प्रकरणांमध्ये लहान मुलांचे खेळ त्यांच्या जीवावरही बेतू शकतात. अगरा (Agra) शहरात खाती पाडा (Khati Pada) परिसरात अशीच एक घटना घडली. एका लहान मुलाने खेळता खेळता आपले डोके चक्क प्रेशर कुकरमध्ये घातले. हा प्रेशर कुकर (Pressure Cooker) या मुलाच्या डोक्याला इतका घट्ट बसला की त्याचे डोकेच त्यात (Head Stuck Inside Pressure Cooker) अडकले. सुरुवातीला अगदी मजेशीर वाटलेली ही घटना हळूहळू गांभीर्य वाढवत गेली. ज्यामुळे मुलाला थेट डॉक्टरांकडे घेऊन जावे लागले. डॉक्टरांनी प्रयत्न करुन पाहिला. मात्र, साध्या प्रयत्नांना यश येत नसल्याचे पाहताच डॉक्टरांनी कुकर कापून मुलाचे डोके आणि ते लहान मुल सुरक्षीत वाचवले. हसन रझा असे या मुलाचे नाव आहे.

लहान मुलाचे डोके प्रेशर कुकरमध्ये अडकल्याचे ध्यानात येताच घरातल्यांनी मुलाचे डोके सोडविण्यासाठी प्रयत्न केला. अनेक प्रयत्न करुनही जेव्हा डोके कुकरबाहेर येत असल्याचे त्यांच्या ध्यानात आले तेव्हा त्यांनी थेट रुग्णालय गाठले. प्रेशर कुकरमध्ये डोके अडकलेले लहान मुल पाहिले तेव्हा डॉक्टरांनाही त्याची दया आली. रुग्णालयाती डॉक्टरांच्या एका टीमने हाताने प्रेशर कुकर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. मग डॉक्टरांनी थेट ग्लायडर मशीन मागवले. ग्लायडर मशिनच्या माध्यमातून डॉक्टरांनी हळूवारपणे कुकर कापला आणि मुलाचे डोके सुरक्षीतपणे बाहेर काढले. (हेही वाचा, अगं बाई! हेल्मेट सापडत नाही, महिलेने डोक्याला घातला कुकर; छायाचित्र व्हायरल)

प्राप्त माहितीनुसार, हसन रझा हा मुलगा आपल्या आईसोबत आजोळी आगरा येथील खाती पाडा परिसरात आले होते. घरातल्या खोलीत एका खोलीत हे मुल एकटेच खेळत होते. खेळता खेळता ते किचनमध्ये जाऊन प्रेशर कुकरसोबत खेळू लागले. मुल खेळत असल्याने घरातल्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान, आतल्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. घरातल्यांनी खोलीत जाऊन पाहिले तर मुलाचे डोके प्रेशर कुकरमध्ये अडकले होते.

प्रेशर कुकरमध्ये अडकले मुलाचे डोके (पाहा व्हिडिओ)

डॉक्टरांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती सध्या ठीक आहे. त्याला घरी पाठविण्यात आले आहे. प्रेशर कुकरमधून डोके बाहेर काढण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागला. ग्लायडर मशीनच्या सहाय्याने कुकर हळूहळू कापण्यात आला. मुलाचे कुटुंबीय अगदीच गरीब होते. त्यामुळे डॉक्टरांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत उपचार केले.