काय सांगता..! चक्क बेडकाने सापाला खाल्लं? पाहा थरारक व्हिडिओ

साप बेडकाला खातो हे आपल्याला माहीत आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. साप आणि बेडकाच्या लढाईत चक्क बेडकाने बाजी मारली आहे. हिरव्या रंगाच्या या बेडकाने केवळ 37 सेकंदात सापाला खाल्ल आहे.

बेडकाने सापाला खाल्लं (PC - You tube)

साप आणि बेडकाच्या भांडणामध्ये नेहमी सापाचा विजय होतो. साप बेडकाला खातो हे आपल्याला माहीत आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. साप आणि बेडकाच्या लढाईत चक्क बेडकाने बाजी मारली आहे. हिरव्या रंगाच्या या बेडकाने केवळ 37 सेकंदात सापाला खाल्लं आहे. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या नक्कीच आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये साप बेडकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, बेडकाने केवळ 37 सेकंदात सापाला जिवंत गिळलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हा व्हिडिओ 2018 मध्ये एका युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला असून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. (हेही वाचा -ऑस्ट्रेलियातील रिपोर्टरच्या खांद्यावर अचानक पडला साप, त्यानंतर जे घडलं ते तुम्हीचं पहा; Watch Video)

दरम्यान, या आठवड्यात ऑस्ट्रलियातील एका महिला पत्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला रिपोर्टर ऑन एअर रिपोर्टिंग करत असताना तिच्या खांद्यावर अचानक एक साप पडला आणि या सापाने माईकला दंश करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे ही महिला थोडीशी घाबरली. मात्र, तरीदेखील तिने शुट थांबवलं नाही. त्यामुळे सर्वत्र या महिलेचं कौतुक होत आहे.