A Drunk Man Obeys Traffic Rules: मद्यधुंद व्यक्तीने पायी चालतानाही केले वाहतूक नियमांचे पालन; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट (Watch Video)
पण ती व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलमुळे एका जागी उभा आहे. हिरवा दिवा लागताचं तो पुढे चालतो. 'दारूमुळे प्रामाणिकपणा येतो' असा मजकूर या व्हिडिओमध्ये दिला आहे.
A Drunk Man Obeys Traffic Rules: आपल्याला नेहमी नशेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण नशा माणसासाठी खूप घातक असते. नशा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याशिवाय दारूच्या नशेत माणूस विचित्र गोष्टी करू लागतो आणि त्याला ते कळतही नाही. अशी अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण नशेत एखादी व्यक्ती काय करू शकते हे पाहून तुम्ही खरचं लोटपोट होणार आहात. होय. सध्या सोशल मीडियावर एका मद्यधुंद व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Drunk Man Viral Video) होत आहे. ज्यामध्ये ती व्यक्ती पायी चालत असूनही रस्त्यावरील वाहतूकीचे नियम फॉलो (Drunk Man Follow Traffic Rules) करते.
रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. यापैकी एक नियम म्हणजे वाहतूक सिग्नल पाळणे. ट्रॅफिक सिग्नलवर लाल रंग दिसला की, वाहन थांबवून ते हिरवे होण्याची वाट पहावी लागते. मात्र, हा नियम गाडी चालवतानाच पाळावा लागतो. पण चालताना हे नियम पाळताना तुम्ही कधी पाहिले आहे का? व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पायी चालत आहे. पण ती व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलमुळे एका जागी उभा आहे. हिरवा दिवा लागताचं तो पुढे चालतो. 'दारूमुळे प्रामाणिकपणा येतो' असा मजकूर या व्हिडिओमध्ये दिला आहे. (वाचा - Viral Video: देसी जुगाड! गरम प्रेशर कुकरने महिलेने केले कपडे इस्त्री, व्हिडीओ व्हायरल)
व्हायरल व्हिडिओ पहा -
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर घंटा नावाच्या पेजने शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 16 लाख 36 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, देश असा चालतो. आणखी एका यूजरने लिहिले, तो हेल्मेट न घालता फिरत आहे. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, गाडी चालवणे थांबवा, तो दारू पिऊन गाडी चालवत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, हे 90ml आश्चर्यकारक आहे, तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, याने दारू नाही गांजाचे सेवन केले आहे.