Woman Gives Birth on KSRTC Bus: थ्रिसूर ते कोझिकोडला जात असताना केएसआरटीसी बसमध्ये 37 वर्षीय महिलेने दिला बाळाला जन्म (Watch Video)
या व्हिडिओमध्ये वैद्यकिय कर्मचारी बसमध्ये महिलेची प्रसृती करताना दिसत आहेत. यात एक परिचारिका नवजात मुलासह बसच्या बाहेर येते. हे पाहून तेथील सर्वच कर्मचाऱ्यांना आनंद होतो.
Woman Gives Birth on KSRTC Bus: 29 मे रोजी सरकारी KSRTC बसमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्या. त्यानंतर तिला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रिशूरहून कोझिकोडला जाणाऱ्या बसमध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. 37 वर्षीय महिलेला बाळाची सुखरूप प्रसूती करण्यासाठी वाहतूक कर्मचारी, डॉक्टर आणि स्थानिकांनी वेळेवर मदत केली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकिय कर्मचारी बसमध्ये महिलेची प्रसृती करताना दिसत आहेत. यात एक परिचारिका नवजात मुलासह बसच्या बाहेर येते. हे पाहून तेथील सर्वच कर्मचाऱ्यांना आनंद होतो.
प्राप्त माहितीनुसार, बसने काही अंतर प्रवास करून पेरामंगलम परिसर ओलांडल्यानंतर महिलेला तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्या. याची माहिती मिळताच बस चालकाने तातडीने फोन घेतला आणि वाहतूक त्रिशूरच्या दिशेने वळवली. बस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी त्रिशूरमधील अमाला हॉस्पिटललाही अलर्ट केले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी महिलेला वॉर्डमध्ये नेण्यात वेळ वाया घालवला नाही. बसमध्येच आवश्यक प्रक्रिया पार पाडली. प्रसूतीनंतर, आई आणि मुलीला नंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - Whale Viral Video: समुद्रकिनारी एक महिला एका महाकाय व्हेलला खाऊ घालत होती, मग पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)
पहा व्हिडिओ -
आई आणि बाळ दोघांची प्रकृती सुखरुप -
रूग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की, त्यांना प्रसृतीदरम्यान, कोणतीही समस्या उद्धभवली नाही. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.