50-year-old White Shark 'Queen of the Ocean' Caught: कॅनडा च्या नोवा स्कोटिया मध्ये सापडला अवाढव्य पांढरा शार्क, Watch Viral Video

संशोधकांचा अंदाज आहे की, 'नुकुमी' हा 8 मोठ्या सफेद शार्कमधील सर्वात मोठा शार्क आहे.

Great White Nukumi (Photo Credits: @OCEARCH Twitter)

अथांग समुद्रात कधी अचानक तुम्हाला शार्क मासा समोर दिसला तर काय होईल? विचारानेही मनात धस्स होईल. मात्र कॅनडामध्ये (Canada) नोका स्कोटियाच्या (Nova Scotia) विशाल समुद्रात शोधकर्त्यांना सापडला अवाढव्य असा पांढ-या रंगाचा शार्क (Shark) . या शार्कचे वजन तब्बल 3541 पाउंड आहे आणि हा 17 फूट 2 इंच इतका लांब आहे. हा पांढ-या रंगाचा शार्क ही मादीची जात आहे. नोका स्कोटिया च्या समुद्रात कामानिमित्त गेले असता शोधकर्त्यांना हा मासा सापडला. OCEARCH च्या वैज्ञानिकांनी या सफेद शार्कला टॅग आणि सॅम्पल केले. त्यांनी या मादी सफेद शार्कला "क्वीन ऑफ ओशियन' (समुद्राची राणी) असे म्हटले आहे. Ocearch ने फेसबुकवर पोस्ट करुन या माशाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'आम्ही त्याचे नाव नुकुमी' ठेवले असून याला नो-गू-मी असे ओळखले जाते. संशोधकांचा अंदाज आहे की, 'नुकुमी' हा 8 मोठ्या सफेद शार्कमधील सर्वात मोठा शार्क आहे. ते सध्या एक अभियान राबवत आहे जे 27 दिवस चालेल. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यात ही नुकुमी सबमर्सिबल प्लेटफॉर्मवर आढळली. Maharashtra: ताडोबा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ अशा Black Leopard दिसल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या 'या' बिबट्यांच्या मागील रहस्य

OCEARCH एका महासागरात माहिती गोळा करत आहेत. ज्यांनी शेकडो शार्क, डॉल्फिन, सील आणि अन्य माशांच्या नमुन्यांना टॅग आणि एकत्र केले आहे. ते या डेटाचा उपयोग मायग्रेशन पॅटर्न विषयी माहिती करुन घेण्यासाठी आणि शार्कच्या जीवनावर अधिक माहिती गोळा करण्यासाठी करणार आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये OCEARCH लूनबर्ग, नोवा स्कोटियामधून एक नर शार्क पकडला होता. आणि त्याला आयरनबाउंड असे नाव दिले होते. वर्ल्ड वाइल्डलाईफ फेडरेशननुसार, ग्रेट व्हाइट शार्क जगातील सर्वात मोठा मासा आहे.