2 Men Urinate Inside Taj Mahal Premises: आग्रा येथील ताजमहाल परिसरामध्ये 2 पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी केली लघवी (Watch Video)

या प्रकरणी अधिक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. आरके पटेल यांनी ताजमहालच्या प्रभारींकडून अहवाल मागवला आहे.

Men Urinate Inside Taj Mahal Premises (फोटो सौजन्य - X/@News1IndiaTweet)

2 Men Urinate Inside Taj Mahal Premises: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा जिल्ह्यातील (​​Agra District) ताजमहाल परिसरात (Taj Mahal Premises) असलेल्या बागेत दोन पर्यटक लघवी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, ताजमहालच्या बागेत दोन पर्यटकांनी लघवी केली. ताजमहालच्या बागेत लघवी केल्यानंतर दोघेही तिथून सहज निघून जातात. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कोणीतरी या दोघांचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हायरल व्हिडिओच्या आधारे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अधिक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. आरके पटेल यांनी ताजमहालच्या प्रभारींकडून अहवाल मागवला आहे. प्रत्यक्षात हा व्हिडिओ कधीचा आहे याचा तपास अधिकारी करत आहेत. ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एएसआयकडून डझनभर कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. असे असतानाही सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांनी लघवी केली. त्यामुळे ताजमहाल आणि परिसराची सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (हेही वाचा - Ghaziabad Juice Vendor Arrested: ज्यूसमध्ये लघवी मिसळली, गाझियाबाद येथील विक्रेत्यास अटक)

ताजमहाल परिसरामध्ये 2 पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी केली लघवी, पहा व्हिडिओ - 

ताजमहालवर तैनात असलेले सैनिक आणि एएसआय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन पर्यटक उघड्यावर लघवी करून निघून गेले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावाही केला जात आहे. मागील आठवड्यात ताजमहालचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ताजमहालच्या मुख्य घुमटातून पाणी गळत असल्याचे दाखवण्यात आले होते. पाण्याच्या गळतीमुळे कॅम्पसमध्ये असलेल्या एका बागेत पाणी शिरले. (हेही वाचा - Ice-Cream With Semen and Urine: किळसवाणे! आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथुन करून ग्राहकाच्या फालुदामध्ये मिसळले वीर्य व मूत्र; तेलंगणामधील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल (Watch))

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. घुमट ओलसर असल्याने पाण्याची गळती झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाण्याच्या गळतीमुळे ताजमहालचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले होते.