Children's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो

सोशल मीडियावर सिनेमा कलाकार अनेकदा आपल्या खासगी गोष्टी शेअर करत असतात. सिनेमा कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोंना अनेकजण पसंती दाखवत असतात. अपूर्वा नेमलेकर, अंकिता खांडेकर, वीणा जगताप, सुखदा खांडेकर, आणि प्रिया बापट या अभिनेत्री नेहमी त्यांच्या सुंदरतेमुळे चर्चेत राहिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, मराठमोळ्या अभिनेत्रींना फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामवरही अधिक फॉल केले जाते. मात्र, तुमच्या या आवडत्या अभिनेत्री त्यांच्या बालपणात कशा दिसायच्या एकदा बघाच!

Veena Jagtap And Priya Bapat (Photo Credit: Instagram)

वीणा जगताप हा मराठी इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. शिक्षण संपल्यानंतर तिला कलर्स मराठी टीव्ही शो ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या मराठी सिनेमातून  प्रिया बापट हिने अभिनयाची  सुरुवात केली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्येही हिने छोट्या भूमिका साकरल्या आहेत.
अंकिता लोखंडे ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. 2009 मध्ये तिने झी टीव्हीच्या पवित्रा रिश्ता या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणारी मालिका अभिनेत्री ठरली होती.
सुखदा खांडकेकर हीने रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.
अपूर्वा नेमलेकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ मराठी मालिकेतील "शेवंता" ही व्यक्तिरेखामुळे बर्‍याच प्रसिद्ध झाल्या आहेत.
Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement