Varun Sardesai: हे सगळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ग्रॅज्युएट, वरुण सरदेसाई यांचा भाजपला टोला

नारायण राणे यांच्या विधानाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'हे तर सगळे रामभाऊ म्हाळगी प्रोबधिनीचे ग्रॅज्युएट आहेत, आसा टोला सरदेसाई' यांनी लगावला आहे

Varun Sardesai | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या युवासेना (Yuva Sena) विभागाचे वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्यावरुन भारतीय जनात पक्षाला (BJP) जोरदार टोला लगावला आहे. नारायण राणे यांच्या विधानाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'हे तर सगळे रामभाऊ म्हाळगी प्रोबधिनीचे ग्रॅज्युएट आहेत, आसा टोला सरदेसाई' यांनी लगावला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्रिपदावर असताना ज्या पद्धतीची विधाने करत आहेत ते पाहता अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची हिच भाजपा आहे का? असा सवालही वरुण सरदेसाई यांनी विचारला आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईस्थित जुहू परिसरातील निवसस्थानी युवा सेनेचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुष शिवसैनिकही मोठ्या परमाणावर जमले आहेत. (हेही वाचा, Narayan Rane: समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ- निलेश राणे)

दरम्यान, नारायण राणे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याबाबतचे आदेश आहेत. तर दुसऱ्या बाजूला अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, नारायण राणे यांच्यावर आतापर्यंत तीन ठिकणी गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा नाशिक येथे दाखल झाला आहे. तर पुणे आणि महाड येथेही राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. राणे यांच्यावर तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर तिन्ही ठिकाणाहून पथके राणेना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे राणे यांना अटक होणार का? नेमके कोणते पथक अटक करणार याबाबत उत्सुकता आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हटले होते?

रायगड येथील महाड येथे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. या यात्रेदरम्यानस सोमवारी (8 ऑगस्ट) बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. नारायण राणे म्हणाले की, ''त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती''.