साईंबाबावरील वादग्रस्त वक्तव्याने धीरेंद्र शास्त्री अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सतत वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहतात.
शिर्डीच्या साई बाबाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते राहुल कनाल यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे. राहुल कनाल यांनी पोलिसांना पत्र लिहून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात साईबाबा यांच्या विरोधातील वक्तव्यासाठी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात ही तक्रार राहुल कनाल यांनी दाखल केली आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून साई बाबांबद्दल लोकांच्या मनात आस्था असून कोणालाही त्यांच्याविरोधात असे वक्तव्य करने टाळले पाहिजे. राहुल कनाल हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेता असून ते शिर्डी साई संस्थानाचे माजी ट्रस्टी देखील आहेत.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सतत वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहतात. गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणं खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही. असे वक्तव्य त्यांनी जबलपूरमध्ये केले होते.