Yulu E-Bike: BKC मध्ये आज पासुन सुरु होतेय युलु ई बाईक सुविधा, जाणुन घ्या काय आहे हा प्रकल्प
वांद्रे (पू.) ते कुर्ला (प.) दरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलात आज 31 ऑगस्ट पासुन युलु ई-बाईक (Yulu E Bike) ही नवीन सुविधा सुरु होत आहे
वांद्रे (पू.) ते कुर्ला (प.) दरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलात आज 31 ऑगस्ट पासुन युलु ई-बाईक (Yulu E Bike) ही नवीन सुविधा सुरु होत आहे, अनेक दिवसांंपासुन या प्रकल्पाची तयारी सुरु होती अखेरीस आजपासुन याचे प्रत्यक्ष काम सुरु होईल. जानेवारी मध्ये मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते मात्र लॉकडाउन (Lockdown) मुळे ही अमंंलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. थोडक्यात सांंगायचे तर, युलु ई बाईक ही एक बाईक शेअरिंग सुविधा असणार आहे, ज्यानुसार आपण भाडे भरुन काही वेळासाठी बाईक बुकींग करु शकाल. बीकेसी हा मोठा विभाग या बाईकने कव्हर होईल यासाठी ही सेवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA ) आणि युलु बाईक यांंनी एकत्रित येउन सुरु केली आहे. यासाठी बुकिंग कसे करावे आणि भाडे किती असेल याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
युलु बाईक बुकिंग कसे करता येणार?
-युलु बाईक साठीचे अॅप गूगल प्ले स्टोअर वरुन वापरकर्त्यांना आपल्या मोबाईल मध्ये घ्यायचे आहे,
-अॅप वरूनच आपण ई-बाईक बुकिंग करु शकाल. ओला, उबर प्रमाणेच तुम्हाला हे बुकिंग करता येणार आहे.
-अॅप मधुन तुम्हाला जवळच्या युलु बाईक स्थानकाची माहिती दिली जाईल.
- बुकिंंग नंंतर या स्थानकातून बाईक घ्यायची आहे तसेच वापरानंंतर बाईक जमा केल्यावर अॅपमधून भाडय़ाची रक्कम कापली जाईल.
-सुरुवातीला 199 रुपये सुरक्षा डिपोझिट भरावे लागेल.
युलु बाईकचे भाडे हे प्रति मिनिटाप्रमाणे आकारले जाणार आहे. युलु स्थानकावरून ई-बाईक घेताना पाच रुपये आकारुन बाईक अनलॉक करण्यास सांंगितले जाईल तसेच बाईक घेतल्यावर प्रति मिनिट दीड रुपये असे भाडे आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, यापुर्वी ठाणे शहरात अशाच प्रकारे भाडे तत्वावर सायकल पुरवण्याची सुविधा सुरु करण्यात आली होती, यासाठी स्थानकात सायकल ठेवल्या जात होत्या ज्याच्यामागे एक QR कोड असायचा, वापरकर्त्यांनी हा कोड आपल्या फोनमधुन स्कॅन करुन सायकल अनलॉक करुन वापरायची होती. या प्रकल्पाला ठाणेकरांंनी उत्तम प्रतिसाद दिला होता.