Mumbai Police Contract Basis: तरुणांनो तयारीला लागा, लवकरच पोलिसही कंत्राटी, मुंबई पोलीस दलात पद भरतीचा निर्णय
त्यानंतर पोलिसांच्या कंत्राटी पदभरतीसाठी गृहखात्याने संमती दिली आहे.
Mumbai Police Contract Basis: काल गृहखात्याने नवीन जीआर (GR) संमती दिली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी कंत्राटी तत्वावर पदभरती होणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही भरती होणार असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे अनेकांनी टीका सुद्धा केली आहे.
पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने मुंबई पोलीस दलात आणखी पोलीस दलाची भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी नव्या भरतीसाठी गृहविभागाला विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांच्या कंत्राटी पदभरतीसाठी गृहखात्याने संमती दिली आहे. पुढील काही महिन्यातंच पोलिसांची ही नवी भरती सुरु होणार आहे. पोलीस दलात शिपाई ते सहाय्यक निरिक्षकांची ४० हजार ६२३ पदे मंजूर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या भागात दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान आणि दिवाळी या सणांच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची आवश्यकता असते. त्यामुळं आता मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठीच नवी भरती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बदल्यामुळे पोकळी
संजय पांडे पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी तीन ते चार हजार पोलीसांना बदलीवर मुंबई बाहेर जाऊ दिले होते. त्यामुळे मोठी मनुष्यबळ पोकळी निर्माण झाली होती. आता ही अनेक पोलीसांची मुंबई बाहेर बदली झाली आहे. त्यांना रुजू व्हायचे आहे परंतू मनुष्यबळ कमी असल्यामुळे शक्य होत नाही.
राज्य सरकारने या वर्षात 21 जानेवारी 2021 रोजी 7076 आणि 994 वाहनचालकांच्या भरतीला मंजूरी दिली. परंतु त्याचे प्रशिक्षण पुर्ण होण्यास दोन वर्षांचा कालवधी लागणार असल्यामुळे तो पर्यंत कंत्राटी पोलीसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता या मागणीला संमती मिळाली आहे त्यामुळे लवकरच कंत्राटी पोलीस भरती सुरु होणार आहे. मुंबईत पोलिसांची मोठी कमतरता असल्याने अनेकदा पोलिसांची मुंबईबाहेर बदली करण्यात येत नाही.