Yavatmal Shiv Sena Leader Murder: शिवसेना पदाधिकारी सुनील डिरवे यांची हत्या, आधी गोळीबार नंतर कुऱ्हाडीने घाव गोळ्या घालून हत्या
हल्लेखोरांनी डिरवे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना ठार मारण्यात आले.
यवतमळ (Yavatmal) जिल्ह्यातील शिवसेना (Shiv Sena) पदाधिकारी सुनील डिरवे (Sunil Divare Shoot Dead) यांची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी डिरवे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना ठार मारण्यात आले. या हत्येमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे. तीन हल्ले खोरांनी ही हत्या केल्याचे समजते. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा (Bhambraja ) येथे ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. सुनील डिवरे (Shiv Sena Leader Sunil Drive Murder) हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य होते.
भांबराजा येथे ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पंचक्रोशीतील अत्यंत लोकप्रिय नेते अशी सुनिल डिवरे यांची ओळख होते. ते 40 वर्षांचे होते. ते ग्रामपंचायत सदस्य होते. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समितीत ते संचालकही होते. डिवरे यांच्या हत्येची बातमी कळताच परिसरात जोरदार खळबळ उडाली. त्यांची लोकप्रियता अधिक असल्याने त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. तीन हल्लेखोरांनी बंदुकीतून डिवरे यांच्यावर गोळ्या घातल्या. या वेळी तीन राऊंड फायर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी कुऱ्हाडीचे घाव घातले. हेही वाचा, शिवसेना नेते Jitendra Khade यांची महिला ऑटो चालकाकडे शरीरसंबंधाची मागणी; पक्षातून हकालपट्टी)
रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या ढिवरे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. हा हल्ला आणि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत निश्चित कारण अद्याप पुढे आले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरुन पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. गर्दी आणि परिसरातील ताण पाहून पोलिसांनी पोलीस बंदोबस्त लावला होता.