Yavatmal Crime News: प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने वार तर स्वत: झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
यवतमाळातून (Yavatmal) एक धक्कादायक बातमी पूढे येत आहे. प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या (Murder) करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी मुलीची प्रकृती गंभीर असुन तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा (Belora) येथील वाकी दुधाना शिवारात ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. प्रेम प्रकरणातून हा गुन्हा धडल्याचं बोलले जात आहे. तर प्रियेसीवर चाकूने वार करणाऱ्या प्रियकराने स्वत:ला देखील फाशी (Hang) लावून घेतली आहे. मृत तरुणाचं नाव गजानन दत्ताजी ढोणे (Gajanan Dattaji Dhone) आहे. तर प्रियेसीवर चाकूने हल्ला केल्यानंतर स्वत प्रियेसीच्या ओढणीने झाडाला फाशी लावून घेत मृत्यूला कवटाळलं आहे. तरी संबंधीत प्रकारणाचा तपास यवतमाळ पोलिस (Yavatmal Police) करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत तरूण गजानन आणि तरूणी यांचे प्रेमप्रकरण होते. हे दोघेही दुचाकीने घाटंजी (Ghatanji) तालुक्यातील बेलोरा येथून एकांताच्या शोधात वाकी दुधाना शिवारात आले. गप्पा मारताना अचानक त्यांच्यात वाद झाला प्रेमात धोका दिल्याचा राग गजाननच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने सोबत चाकू (Knife) व कटर (Cutter) आणले होते. गजाननने कोमलच्या गळ्यावर चाकूने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. नंतर तिच्या ओढणीने गजाननने झाडाला गळफास लावून घेतला. यात गजाननचा जागीच मृत्यू झाला. (हे ही वाचा:- Mumbai Cyber Fraud: भारतीय लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवत मुंबईतील महिलेची ऑनलाइन फसवणूक, घर खरेदी करण्याच्या नावाखाली घातला 3.68 लाखांचा गंडा)
शेतातून घराकडे जात असणाऱ्या मजुरांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरूणी दिसली. मजुरांनी तात्काळ वडगाव जंगल पोलिसांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले असुन तरुणीची प्रकृती सध्या गंभीर आहे. तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणी अल्पवयीन आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

