Yavatmal Crime News: दारूसाठी तीन वर्षांचं पोरगं विकलं, मित्रांसोबत पार्टी केली, यवतमाळमधील बापाचे कृत्य

दारु (Liquor) पिण्यासाठी पैसे उपलब्ध करण्याच्या हेतूने एका व्यक्तीने चक्क आपल्या तीन वर्षांच्या मुलाची विक्री केली आहे.

Arrested | (File Image)

दारुच्या आहारी गेलेल्या एका मद्यपी बापाचे निर्दयी कृत्य यवतमाळ(Yavatmal Crime News) जिल्ह्यातून पुढे येत आहे. दारु (Liquor) पिण्यासाठी पैसे उपलब्ध करण्याच्या हेतूने एका व्यक्तीने चक्क आपल्या तीन वर्षांच्या मुलाची विक्री केली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने म्हणजेच पतीविरोधात म्हणजेच मुलाच्या वडिलांविरोधात आर्णी पोलीस (Arni Police) स्टेशमध्ये तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवत आर्णी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे तर इतर दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. श्रावण दादाराव देवकर (32 वर्षे) आणि चंद्रभान देवकर (65 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या ओरपीचे नाव आहे. श्रावण हा पीडित मुलाचा बाप आहे.

पती पत्नीमध्ये कौटुंबीक वाद

यवतमाळ जिल्ह्यातील आरोपी आणि तक्रारकर्ती महिला पुष्पा देवकर (वय 23) पती पत्नी आहेत. मात्र, कौटुंबीक वाद आणि परस्परांशी पट नसल्याने दोघेही पाठिमागील काही महिन्यांपासून वेगवेगळे राहतात. दोघांना एक तीन वर्षांचा मुलगा आहे. जो वडिलांसोबत राहतो. पती असलेल्या आरोपी श्रावण दादाराव देवकर यास दारुचे प्रचंड व्यसन आहे. त्यातूनच त्याने मुलाची तेलंगणा येथील निर्मल येथे विक्री केली. ही बाबत मुलाच्या आईला समजताच तिने पोलीस स्टेशन गाठत पतीविरोधात तक्रार दिली. धक्कादायक म्हणजे आरोपीने मुलाला विकून आलेल्या पैशातून आरोपीने प्रचंड प्रमणात दारु प्यायली आणि मित्रांसोबत पार्टी केली. (हेही वाचा, Mumbai Crime: लहान मुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, काही लाख रुपयांसाठी थेट विक्री, सहा जणांना अटक)

दोन आरोपींना कोपरा गावातून अटक

पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आर्णी पोलिसांनी आतापर्यं दोघांना कोपरा गावातून अटक केली आहे. या प्रकणातील आणखी दोन आरोपी कैलास लक्ष्मण गायकवाड (वय 55 वर्षे, रा. गांधी नगर, आर्णी) आणि बाल्या गोडांबे (रा. महागाव कलगाव ता. दिग्रस ) सध्या फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Bead Crime: एक वर्षाच्या बाळाची 3.5 लाख रुपयांना विक्री, पाच आरोपींना अटक, दोघे फरार; बीड येथील घटना)

अधिक माहिती अशी की, आरोपी श्रावण दादाराव देवकर आणि तक्रारदार पुष्पा देवकर यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. या विवाहातून दोघांना एक मुलगा झाला. त्याचे नाव जय असून तो तीन वर्षांचा आहे. आरोपीला दारुचे व्यसन असल्याने पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत. त्यातून दोघे वेगळे राहू लागले. दरम्यान, आरोपी आणि त्याच्या साथीरादांनी मुलाची आदिलाबाद, तेलंगणा येथे विक्री केली. याबाबतची माहिती पत्नी पुष्पा यांना विकली. तिने लागलीच पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांन घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन तातडीने आरोपींना अटक केली. मुलाचाही शोध सुरु आहे.