Yavatmal: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; यवतमाळ येथील घटना
ही घटना घाटंजी (Ghatanji) तालुक्यात शुक्रवारी (29 जानेवारी) घडली आहे.
यवतमाळ (Yavatmal) येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला केल्यानंतर आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घाटंजी (Ghatanji) तालुक्यात शुक्रवारी (29 जानेवारी) घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तसेच तिच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तरूणीवर हल्ला केल्यानंतर आरोपीनेही स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
चितांमण पुसनाके असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पीडित तरूणीवर ही आपल्या मैत्रीणीसोबत शेतात गेली होती. मात्र, चितांमण हा देखील तिचा पाठलाग करत तिच्यामागे शेतात आला. त्यावेळी आरोपीने तू दुसऱ्या व्यक्तीशी कसे काय लग्न करते? असे विचारत तिच्या पोटात चाकू भोकसला. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. यावेळी तिच्या सोबतच्या मैत्रिणींनी आरडाओरड केला. त्यानंतर या घटनेची माहिती होताच तरूणीच्या काकाने तिला खाद्यांवर ऊचलून 500 मीटरपर्यंत आणले. त्यानंतर दुचाकीच्या साहाय्याने तिला घाटंजी रुग्णालयात दाखल केले. तरूणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Mumbai - Pune Expressway Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर थरार, बंदूक दाखवून ओव्हरटेक, गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल
या घटनची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, तरूणीवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपीनेही विष प्राशन केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने आरोपीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून संतापजनक प्रतिक्रिया येऊन लागल्या आहेत. तसेच याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडत तरूणीचे नातेवाईक करत आहेत. तसेच राज्यात एकतर्फी प्रेमाच्या घटनेतून तरुणींवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.