Kumar Maharashtra Kesari Suicide: 'कुमार महाराष्ट्र केसरी' Wrestler Suraj Nikam याची आत्महत्या; आयुष्याच्या आखाड्यात अकाली चितपट
सूरज हा 'कुमार महाराष्ट्र केसरी' (Kumar Maharashtra Kesari) आहे. आपल्या डावांनी कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना चितपट करणाऱ्या या तरुण पैलवानाचा मृतदेह आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी (28 जून) रात्री आढळून आला.
सूरज निकम (Wrestler Suraj Nikam Suicide) याने आत्महत्या केली आहे. सूरज हा 'कुमार महाराष्ट्र केसरी' (Kumar Maharashtra Kesari) आहे. आपल्या डावांनी कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना चितपट करणाऱ्या या तरुण पैलवानाचा मृतदेह आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी (28 जून) रात्री आढळून आला. त्याच्या आत्महत्येची माहिती बाहेर येताच सांगली शहरासह राज्यातील कुस्तीविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.
यशाचा आलेख चढा असतानाही आत्महत्या
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात येणाऱ्या नागेवाडी गावातील रहिवासी असेलला सुरज निकम हा कुस्तीच्या आखाड्यात आपले नाव बाळगून होता. त्याने कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्या मल्लांना चितपट केले आहे. त्यामुळे 'कुमार महाराष्ट्र केसरी' होण्याचा मानही त्याला मिळाला. दरम्यान, आपल्या पैलवानकीच्या क्षेत्रात आवश्यक यश मिळत असताना आणि यशाचा आलेख चढा असतानाही त्याने आत्महत्या का केली असावी? याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (हेही वाचा, World Suicide Prevention Day 2020: आत्महत्येचा विचार, नैराश्य यामधून आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा या Suicide Prevention Helplines वर संपर्क करा)
आयुष्याच्या आखाड्यात अकाली चितपट
सूरज याच्या आत्महत्येची बातमी येताच त्याचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव आणि तुलाक्यासह जिल्हा आणि राज्यातील कुस्तीविश्वात शोककळा पसरली. आखाड्या उतरल्यावर समोरच्या मल्लाला त्याच्याही न कळत आस्मान दाखवणारा हा तरुण पैलवान आयुष्याच्या आखाड्यात असा अकाली चितपट का झाला असावा? असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. केवळ तालुका, जिल्हाच नव्हे तर राज्याच्या कुस्तीविश्वातही त्याने स्वत:चा ठसा उमटवत दबदबा निर्माण केला होता. (हेही वाचा, IIT Kharagpur: आयआयटी खरगपूर कॅम्पसमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ)
मृतदेह विटा पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, सूरज निकम याचा मृतदेह विटा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विटा ग्रामीण रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतर तो त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला जाईल. दरम्यान, त्याचे बंधू आल्यानंतर शनिवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात नेमके काय पुढे येते याबाबत उत्सुकता आहे.
आत्महत्या टाळण्यासाठी आणि मदतीसाठी हेल्पलाईन
दरम्यान, आत्महत्या हा कोणत्यारी प्रश्नावरचे अंतिम उत्तर असत नाही. आत्महत्या हा आपल्या दुर्बलपणाचा दाखला आहे. त्यामुळे कोणीही या मार्गाने जाऊ नये. जर आपणास अगदीच अस्वस्थ वाटू लागले किंवा आत्महत्येची लक्षणे दिसणाऱ्या कोणाला ओळखत असल्यास, योग्य समुपदेशनासाठी आत्महत्या प्रतिबंधक मंचांशी त्वरीत संपर्क साधा. तुम्ही हेल्पलाइन नंबर- 9152987821 वर संपर्क साधून मदत घेऊ शकता.