Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीने पबमध्ये बनावट ओळखपत्र वापरले; पबच्या व्यवस्थापनाचा दावा
बवानट ओळपत्र वापरून त्याने पबमध्ये दारू प्यायली असा दावा पब व्यवस्थापनाने केला आहे.
Worli Hit And Run Case: मुंबईमधील वरळी येथे हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीने बारमध्ये बनावट ओळखपत्र दाखवल्याचे समोर आले आहे. बवानट ओळपत्र वापरून त्याने पबमध्ये दारू प्यायली असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तावरून समोर आले आहे. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मुंबई पोलिसांनी काल बुधवारी आरोपी मीहीर शाहला अटक केली. आरोपी मिहीर शाह अधिकृत नोंदीनुसार 23 वर्षांचा आहे. मात्र, दारू पिण्याचे किमान वय 25 असल्याने त्याने खोटे ओळखपत्र दाखवले ज्यात तो 27 वर्षांचा असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्याने बनावट ओळखपत्र दाखवून दारू प्यायली असल्याचा दावा पब व्यवस्थापनेने केला. (हेही वाचा:Worli Hit And Run Case: शिवसेना शिंदे गटातून राजेश शहा यांची हकालपट्टी )
पबच्या व्यवस्थापनाने सांगितले की,आरोपीने त्यांना दाखवलेल्या ओळखपत्रामध्ये तो 27 वर्षांचा असल्याचे दर्शविले. त्याच्यासोबत पबमध्ये गेलेल्या त्याच्या तीन मित्रांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त होते. दरम्यान, बेकायदेशीरपणे बांधलेल्या पबचा काही भाग काल मुंबई महानगरपालिकेने पाडला. कावेरी नाकवा आणि त्यांचा पती प्रदिक नकवा रविवारी दुचाकीवरून जात असताना शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मीहीर शाह याने त्याच्या बीएमडब्ल्यूने स्कूटीला धडक दिली आणि तेथून पळ काढला.
पोलिसांनी म्हटले आहे की, सीसीटीव्ही फुटेजमधून बीएमडब्ल्यूने महिलेला बोनेटवरून ओढत नेल्याचे समोर आले आहे. त्या अपघाता कावेरी नाखवा याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. ज्यात बीएमडब्ल्यूची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली. आरोपी फरार झाला. (हेही वाचा:Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी Mihir Shah ला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वडील Rajesh Shah यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी)
दरम्यान, हे प्रकरण तापल्यानंतर राजेश शहा यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली . पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत पक्षाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्याशिवाय, ‘हिट अँड रन प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल.’ असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले.