मुंबईकरांचे वातानुकूलित लोकलचे स्वप्न लांबणीवर

ल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) आता निधीचा प्रश्न सोडविण्यासाठी इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशनकडे (आयआरएफसी) मदत मागण्याचा विचार करत आहे.

मुंबई लोकल ट्रेन(Photo Credits: PTI)

..आपल्याला वातानुकूलित (एसी) लोकल कधीतरी उपलब्ध होईल,असा विचार घामाने थबथबलेल्या अवस्थेत  नियमीत करणाऱ्या प्रत्येक मुंबईकरासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही जर एसी लोकलचे स्वप्न रंगवत असाल तर, तुमचे स्वप्न आणखी लांबणार आहे. मुंबईच्या एसी ट्रेनला निधी पूरवण्यासाठी वर्ल्ड बॅंकेने नकारघंटा दर्शवलीय. त्यामुळे मुंबईत भविष्यात धावणाऱ्या 'त्या ४७ एसी' लोकल्सना रुळावर येण्याआधीच ब्रेक लागला आहे. त्यामुळे रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) आता निधीचा प्रश्न सोडविण्यासाठी इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशनकडे (आयआरएफसी) मदत मागण्याचा विचार करत आहे.

लोकलमध्ये चढताना रोजची धक्काबुक्की, वेळ गाठण्यासाठी वेळप्रसंगी दरवाजात लटकणे आणि हे सर्व टप्पे पार केल्यानंतर अखेर डब्यात किमान उभे रहायला मिळणारे स्थान. हे सर्व सोपस्कर पार पडले की, मुंबईकर हैराण होतो डब्यातील श्वास गुदमरवणारी गर्दी आणि अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांनी. पण, गेल्या काही काळात मुंबईत एसी लोकल धावणार अशी चर्चा सुरु झाली आणि विद्यमान लोकलमधील फॅनच्या गरम हवेखाली मुंबईकर गारेगार प्रवासाची स्वप्ने पाहू लागला. पण, वर्ल्ड बँकेच्या निर्णयाने या स्वप्नांना तडाच गेला आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत सध्या एकच एसी लोकल असून, ती पश्चिम रेल्वे माग्रावर चर्चगेट ते विरारदरम्यान धावते. ही लोकल दिवसाकाठी १२ फेऱ्या करते. दरम्यान, नव्या ४७ एसी लोकलचा प्रवास वर्ल्ड बँकेने निधी देण्यास नकार दिल्याने अडला आहे. दरम्यान, वर्ल्ड बँकेने निधी देण्यास नेमका नकार का दिला याचे मात्र अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने मुंबई मिररने म्हटले आहे की, एसी लोकल ट्रेन ही भाडेतत्त्वावर घ्यावी की, संपूर्ण ट्रेनच विकत घ्यावी याबाबत एकमत नव्हतं. तसेच, ही ट्रेन स्वदेशी बनावटीची असावी की, ती थेट विदेशातून आयात करावी याबाबतही मतमतांतरे होती. वर्ल्ड बँकेतील सूत्रांचे म्हणने असे की, विरार-पनवेल कॉरिडोअरला प्राथमिकता दिली जावी असा वर्ल्ड बँकेचा आग्रह होता. मात्र, केंद्राची परवानगी आणि इतर काही बाबींमुळे ते शक्य नसल्याचे एमआरव्हीसी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.



संबंधित बातम्या