दिवाळी बोनस न दिल्यामुळे संतप्त कामगाराने केलेल्या मारहाणीत मालकाचे पाडले दात
बाळू पठारे असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास घेत आहेत.
दिवाळी सण जवळ आला की सर्व नोकरदार वर्गाला उत्सुकता लागते ती बोनसची. या बोनसवर त्यांचे दिवाळीचे सर्व शॉपिंग बजेट अवलंबून असते. त्यात जर दिवाळी बोनस नाही मिळाला तर ब-याच नोकरदारवर्गाची चिडचिड होते. अशा परिस्थितीला त्रस्त झालेल्या एका कामगाराने बोनस मिळाला नाही दिला म्हणून मालकाला जबरदस्त मारहाण करुन त्याचे दात पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळू पठारे असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास घेत आहेत.
पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार, बाळू पठारे या कामगाराला भिमा जोशी या लेबर कॉन्ट्रक्टरने दिवाळीचा बोनस नंतर देतो असे सांगितले. त्यामुळे बाळू पठारे याचा राग अनावर झाला झाला आणि त्याने भिमा जोशी याला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत त्या कॉन्ट्रक्टरचे दात पडले. ही घटना 26 ऑक्टोबरला औरंगाबादेतल्या (Aurangabad) उत्तरानगरी येथे घडली.
हेदेखील वाचा- बेस्ट कर्मचार्यांसाठी खूषखबर! सार्या कर्मचार्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा
बोनस नंतर देतो असं सांगितल्या कारणाने बाळू पठारे यांना भिमा जोशी यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांनी त्यांच्या तोंडावर एक जोरदार मुक्का मारला. ज्यात त्याचे दात पडले.
याप्रकरणी एआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.