Shiv Sena: महिला शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा काढता पाय
बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांना बसला. मतदारसंघातील विकासकामांची माहिती देण्यासाठी डॉ. बालाजी किणीकर मतदारसंघात गेले. त्यावेळी आक्रमक महिला शिवसैनिकांनी (Women Shiv Sainiks) डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. महिला शिवसैनिकांचा रोष पाहताच डॉ. किणीकर यांनी काढता पाय घेतला.
Maharashtra Politics Shivsena: शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. बंडखोर गट हा आम्ही शिवसेनेत असल्याचेच सांगत असला तरी मूळ शिवसैनिकांना ते फारसे पसंद पडल्याचे दिसत नाही. याच रोषाचा फटका शिवसेना बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांना बसला. मतदारसंघातील विकासकामांची माहिती देण्यासाठी डॉ. बालाजी किणीकर मतदारसंघात गेले. त्यावेळी आक्रमक महिला शिवसैनिकांनी (Women Shiv Sainiks) डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. महिला शिवसैनिकांचा रोष पाहताच डॉ. किणीकर यांनी काढता पाय घेतला.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु होती. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती देण-घेणे सुरु होते. या वेळी अचानक महिला शिवसैनिक बैठक सुरु असलेल्या मुख्यमाधिकाऱ्यांच्या दालनात थेट पोहोचले. आमदार किणीकर यांनी शिवसेना महिला आघाडीला न विचारता थेट केबिन गाठली असा महिला शिवसैनिकांचा आरोप आहे.
आक्रमक महिला शिवैसैनिकांनी बैठकीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना का बोलवण्यात आले नाही? असा सवाल करत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आपण स्वत:चा वेगळा गट का केला असाही जाब या शिवसैनिकांनी विचारला. या वेळी आमदार किणीकर बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, महिला शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. अखेर महिला शिवसैनिकाची आक्रमकता पाहून आमदार किणीकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.