मुंबईत महिलेला 16 महिन्यात 5 हार्ट अटॅक; डॉक्टरही समस्येचं कारण शोधताना चक्रावले!
सप्टेंबर महिन्यात तिचं वजन 107 किलो होतं. त्यानंतर ते 30 किलो कमी करण्यात आलं.
आजकाल हृद्यविकाराचा (Heart Attack) त्रास हा सार्याच वयोगटामध्ये दिसून येत आहे. मुंबईच्या मुलुंड भागात एका महिलेला 16 महिन्यात 5 ह्दयविकाराचे झटके आले आहेत. या महिलेने या पाचही हृद्यविकाराच्या झटक्यात मृत्यूला चकवा दिला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्र चक्रावून गेले आहे. दरम्यान ही महिला 51 वर्षीय असून तिच्यावर 6 वेळा अँजिओप्लास्टी (Angioplasty) झाली आहे, तर एकदा ओपन हार्ट बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. महिलेला पाच स्टेंट बसवण्यात आले आहेत.
सप्टेंबर 2022 मध्ये ही महिला जयपूर वरून बोरिवलीला येत असताना पहिला हृद्यविकाराचा झटका आला. त्यावेळी अहमदाबादमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारांनंतर अॅन्जिओप्लास्टी साठी त्यांनी मुंबई गाठली. मुलूंडच्या फोर्टिस मध्ये तिच्यावर उपचार झाले. Heart Attack Detection Project: आता AI च्या माध्यमातून Critical Heart Attacks चा धोका ओळखून उपचार शक्य; महाराष्ट्रात 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रूग्णांना मिळाली तातडीची मदत .
हृदयरोगतज्ज्ञ डॉ हसमुख रावत यांनी 'महिलेवर दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया झाल्या असून जुलै महिन्यापासून तिच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तिच्या हृदयातील समस्येचं कारण एक गूढच असल्याचं म्हटलं आहे.' अनेक डॉक्टरांसह तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की व्हॅस्क्युलायटिससारख्या स्वयं-प्रतिकारक रोगात रक्तवाहिन्या फुगतात आणि अरुंद होतात, परंतु चाचण्यांमध्ये अद्याप कोणतेही स्पष्ट निदान झालेले नाही. असे Times Now च्या वृत्तात म्हटलं आहे.
महिला रूग्णाला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये हार्ट अटॅक आला आहे. ठराविक काही महिन्यांना त्यांना पुन्हा पुन्हा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे परत येतात. यामध्ये छातीत तीक्ष्ण वेदना, ढेकर येणं आणि अस्वस्थता जाणवणं यांचा समावेश आहे.
दरम्यान महिला हदयविकारासोबतच उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि मधुमेहाची देखील रूग्ण आहे. सप्टेंबर महिन्यात तिचं वजन 107 किलो होतं. त्यानंतर ते 30 किलो कमी करण्यात आलं. कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं आणि इंजेक्शन देखील दिली आहेत. या औषधांमुळे कोलेस्ट्रॉल, शुगर नियंत्रणामध्ये राहत आहे पण हृद्यविकारांच्या झटक्यांचा त्रास सुरूच आहे.