Woman Strips In Front Of Mantralaya: वीज जोडणी प्रकरणाच्या निषेधार्थ महिला मंत्रालयासमोर झाली विवस्त्र; महिलेवर गुन्हा दाखल

या महिलेविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला होता.

मुंबई मंत्रालय | (संग्रहीत प्रतिमा)

Woman Strips In Front Of Mantralaya: मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. वीज जोडणी प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी एका महिलेने मंत्रालयासमोर (Mantralaya) विवस्त्र होण्याचा (Woman Strips) प्रयत्न केला. या महिलेला अटक करून मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 36 वर्षांची ही महिला नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी आहे.

2017 मध्ये, तिने महाराष्ट्र राज्य वीज कंपनीच्या कार्यालयात तिच्या घराच्या कनेक्शनबाबत आंदोलन केले होते. या महिलेविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला होता. (हेही वाचा - Nanded Hospital Tragedy: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरूचं; 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान आणखी 7 रुग्णांचा मृत्यू)

या प्रकरणातील तपास अधिकारी तिचा मानसिक छळ करत असून मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे तिने सोमवारी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी महिलेने केली आहे.

सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान महिलेने सरकारवर दलित आणि मुस्लिम महिलांवरील अत्याचाराचा आरोप करणारे बॅनर हातात घेतले होते. पोलिसांनी महिलेचा ‘स्ट्रिप निषेधा’विरुद्ध समुपदेशन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जर पोलिसांनी तिला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ दिली नाही तर ती आपले आंदोलन सुरू ठेवणार असल्याचंही महिलेने पोलिसांना सांगितलं. याशिवाय महिलेने आत्मदहनाची धमकी देखील दिली. दरम्यान, अनुचित घटना टाळण्यासाठी तिला अटक करण्यात आली आहे.