Woman Jumps off Atal Setu : अटल सेतूनवरुन उडी घेत डॉक्टर महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू
महिलेच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शोध मोहीम सुरु आहे.
Woman Jumps off Atal Setu : नवी मुंबईतून मुंबईपर्यंतचा प्रवास लवकर पूर्ण व्हावा यासाठी अटल सागरी सेतूची(Atal Setu) निर्मीती करण्यात आली. मात्र, त्यावर आता नागरिकांच्या आत्महत्येच्या (suicide)घटना घडत आहेत. सोमवारी अटल सेतूवरून ४३ वर्षीय महिलेने उडी घेत आत्महत्या केली. मृत महिला मुंबईतील रहिवाशी होती. पेश्याने डॉक्टर असलेल्या माहिलेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस महिलेल्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. (हेही वाचा:Littering Issue at Atal Setu: अटल सेतूवर कचरा टाकणे, गाड्या थांबवणे सुरु, पहा व्हायरल फोटो)
मिळालेल्या माहितीनुसार, महिला टॅक्सीने दुपारी पावणे दोनच्या सुमारास अटल सेतूवर आली होती. फोटो काढायचा आहे, असं सांगून महिलेने टॅक्सी चालकाला टॅक्सी थांबवायला सांगितली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून महिला सव्वा दोनपर्यंत अटल सेतूवरच थांबली. त्यानंतर महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली. ही सर्व घटवा टॅक्सी चालकाच्या समोर घडली. त्याने तात्काळ पोलिसांना याबाबत सूचना दिली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा:Mumbai Atal Setu: 'लोकांच्या सोयीसाठी बांधलेल्या 'अटल सेतू’वर थांबून फोटो काढणे बेकायदेशीर'; Mumbai Traffic Police यांनी केले नागरिकांना आवाहन)
पोलिसांकडून मृतदेहाची शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप महिलेचा मृतदेह मिळाला नसून पोलीस शोध घेत आहेत. मृत महिला आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होती. डॉक्टर असणारी ही महिला मागील दहा वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती. महिला डॉक्टरने घरातून निघताना सुसाईड नोट देखील लिहिली होती. ज्यात तिने अटल सेतूवरून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. पोलीस पुढचा तपास करत आहे.