Mumbai Shocker: मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात उडी मारून तरुणीची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
तरुणी आयटी क्षेत्रात काम करत होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
Mumbai Shocker: मुंबईतील मरीन ड्राईव्ह(Marine Drive) येथे समुद्रात एका तरुणीने उडी मारून आत्महत्या (woman committed suicide)केल्याची घटना घटली. सोमवारी सकाळी आत्महत्येची ही घटना घडली. त्याबाबतची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ममता कदम असं 23 वर्षीय तरूणीचं नाव आहे. तरूणीने समुद्रात उडी घेतल्याची घटना समजतात पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास तरुणीला समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जवळच्या जीटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नाही. (हेही वाचा:Matheran Shocker: माथेरानला फिरण्यासाठी गेलेले जोडपे बेपत्ता, पाच दिवसांनी सापडला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु )
'मृत तरुणीने तिची बॅग तिथे एका ठिकाणी ठेवली होती. बॅगमध्ये आढळलेल्या ओळखपत्रावरून तरुणी अंधेरी येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याशिवाय, ती एका नामांकित आयटी फर्ममध्ये काम करत होती. ती कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली,' असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिने वैयक्तिक कारणामुळे आपले जीवन संपवले असल्याचा अंदाज व्क्त केला जात आहे.