मुंबई: ऑफिस मधून 30 लाख चोरून महिला अकाउंटंट प्रियकरासोबत फरार, CCTV फुटेज मध्ये मिळाला पुरावा
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीही फुटेजच्यामाध्यमातून कंपनीच्या समोर आला.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये स्थित एका डायमंड कंपनीतील महिला अकाउंटंटने ऑफिसमधून 30 लाख रुपयांची चोरी केल्याची बाब समोर आली आहे. ही चोरलेली रक्कम घेऊन महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. कंपनीच्या लॉकर मधून एकाएकी इतकी रोकड गायब झाल्यावर कंपनीने तपास केला यामध्ये पूजा दराल (Pooja Daral) या 25 वर्षीय अकाउंटंटचे नाव पुढे आले आहे. ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यावर अनेकांनी हा प्लॅन फार पूर्वीपासून आखला जात असल्याचे सांगितले आहे. पूजाने फरार होण्यापूर्वी १६ लाख रुपये आपला मित्र अभिषेक खेमकार (Abhishek Khemkar) याकडे ठेवली होती. हा प्रकार लक्षात येताच आता पोलिसांनी अभिषेकला मानखुर्द (Mankhurd) येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऑफिसच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची खबर लागताच त्यांनी ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यातील एका फुटेज मध्ये पूजा ऑफिसच्या लॉकर मधून पैसे काढताना तर तिचा मित्र अभिषेक तिला हे पैसे जमा करायला मदत करत असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेताच त्याची कसून चौकशी करायला सुरवात केली ज्यामध्ये अभिषेकने झाला प्रकार कबुल करून पूजाने चोरी केलेल्या पैशातून एक कार खरेदी केली व उर्वरित रोकड घेऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे सांगितले. पूजाला स्वतःचा व्यापार सुरु करायचा होता तसेच तिच्या प्रियकरासोबत लग्न करून सेटल होण्याचा तिचा प्लॅन होता त्यामध्ये पैशाची गरज असल्याने तिने ही चोरी केली अशी माहिती अभिषेकने तूर्तास दिली आहे. Mira Road: जेवणाचे बिल भरण्याचे कारण सांगून हॉटस्पॉटसाठी चक्क ग्राहकाने लंपास केला हॉटेलमालकाचाच मोबाईल
याबाबत माहिती देताना, डायमंड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पूजा न सांगता अनेक दिवसांपासून ऑफिसला येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्यावर संशय येऊ लागला. दरम्यान पूजाच्या विरुद्ध कंपनीने रीतसर तक्रार नोंदवली असून आता पोलीस तिचा व तिच्या प्रियकराचा तपास करत आहेत.